UPSC Success Story: मालेगावच्या शेतकऱ्याची लेक IPS झाली; MPSC नंतर UPSCत घवघवीत यश; धनश्री अहिरे यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC Success Story of Farmer Daughter Dhanashri Ahire Become IPS: महाराष्ट्रातील पाटणे येथील धनश्री अहिरे यांनी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे.
UPSC Success Story
UPSC Success StorySaam TV
Published On
Summary

मालेगावच्या पाटणे गावच्या लेकीची कमाल

धनश्री अहिरे झाल्या IPS

यूपीएससी परीक्षेत मिळवली ४८९ रँक

अजय सोनावणे, साम टीव्ही प्रतिनिधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा काल निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या अनेक उमेदवारांनी बाजी मारली आहे.पाटणेमधील धनश्री अहिरे यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. मालेगाव येथील धनश्री अहिरे यांनी पाचव्या यशात संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा पास केली. देशातून ४८९ रँक मिळवत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल अनेकांनी तिचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

UPSC Success Story
Success Story: आईला कॅन्सर, लेक बनली ताकद; खडतर परिस्थितीवर मात करत झाली IAS; पल्लवी वर्मा यांचा प्रवास

धनश्री यांचा प्रवास (Dhanashri Ahire UPSC Success Story)

धनश्री जिभाऊ अहिरे यांचे प्राथमिक शिक्षण पाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण पाटणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू तर अकरावी व बारावीचे शिक्षण सटाणा येथील महाविद्यालयात घेतले.

धनश्री यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला दोन वर्ष पुणे येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. २०२१ मध्ये पहिली परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी तीन परीक्षा दिल्या तिन्ही परीक्षा त्या मुलाखतीपर्यंत पोहल्या होत्या. २०२५ मध्ये त्यांनी पाचव्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यांची मुलाखत देखील झाली होती. यामध्ये त्यांना यश मिळाले.

शुक्रवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. यात धनश्रीने देशातून ४८९ रँक मिळत पोलीस खात्यात आयपीएस पदाला गवसणी घातली. मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) या पदासाठी परीक्षा दिली होती. त्याचा निकाल चार महिन्यापूर्वी लागला या त्यांची सहाय्यक वनसंरक्षण या पदासाठी निवड झाली होती.

शेतकऱ्याची लेक IPS

धनश्री यांच्या घरात कोणीही उच्चशिक्षित नाही. आई वडील शेती करतात. धनश्री यांची बारावीपासूनच आयपीएस होण्याचे स्वप्न बाळगले होते. धनश्रीने आयपीएस अधिकारी भरत आंधळे व विश्वास नागरे पाटील यांची लहानपणापासूनच पुस्तक वाचत व व्हिडिओ बघून प्रेरणा घेतली. बारावीनंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. धनश्री घरात मोठी असून लहान बहीण अकरावीला तर भाऊ नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

UPSC Success Story
Success Story: ४०वेळा फेल, १२ वर्षांच्या मेहनतीनंतर स्वप्न सत्यात उतरले; शेतकऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

पाटणे गावातील पहिली महिला आयपीएस अधिकारी

पाटणे हे गाव मालेगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील नागरिकांच्या मुख्य व्यवसाय हा शेती आहे. धनश्री अहिरे हिचे वडील जिभाऊ जगन्नाथ अहिरे हे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे, ते शेती करतात. धनश्री ही गावातील पहिली महिला आयपीएस अधिकारी झाल्याने जिभाऊ अहिरे व गावकऱ्यांनी तिचा सत्कार केला.

पाच वेळा यूपीएससीची परीक्षा दिली. आठ ते नऊ तास अभ्यास केला. निवडलेले क्षेत्रात जिद्द व चिकाटी पाहिजे. यात आई-वडील व घरच्यांचे पाठबळ लाभले. कोणतेही क्लास न लावता यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा अभिमान आहे.

UPSC Success Story
Success Story: साताऱ्याचा ओमकार IAS झाला, ४ वेळा अपयश आलं पण हरला नाही, वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com