Success Story: साताऱ्याचा ओमकार IAS झाला, ४ वेळा अपयश आलं पण हरला नाही, वाचा शेतकर्‍याच्या लेकाची यशोगाथा

Success Story of Nashik IAS Omkar Pawar: आयएएस ओमकार पवार यांनी पाचव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षातून अभ्यास करण्यास सुरुवात केली.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

नाशिकचे जिल्हाधिकारी ओमकार पवार यांचा प्रवास

आधी IPS मग IAS

साताऱ्याच्या लेकाची यशोगाथा

नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ ओमकार पवार हे आपल्या कामामुळे चर्चेत असतात. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करुन आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी यूपीएससी परीक्षे १९४ रँक प्राप्त केली. देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी परीक्षा दिली.

Success Story
Success Story: शाळा, कॉलेजमध्ये फेल, दोनदा केली UPSC पास; IAS अनुराग कुमार यांचा प्रवास

ओमकार पवार हे मूळचे साताऱ्यातील आहेत. त्यांच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओमकार यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आयएएस अधिकाऱ्यांना मिळणार सन्मान पाहून आपल्याही लेकाला असा मान मिळावा, असं त्यांच्या आईला वाटत होतं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

ओमकार पवार यांचे शिक्षण (IAS Omkar Pawar Education)

ओमकार यांचे शिक्षण सरकारी शाळेतून झाले. यानंतर त्यांनी पुण्यातील एका कॉलेजमधून इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. त्यांना कधीच इंजिनियरिंग करायचे नव्हते. परंतु घरच्यांच्या इच्छेमुळे त्यांनी इंजिनियरिंग पूर्ण केले. ओमकार यांनी इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंतही यूपीएससी परीक्षा देण्याचा विचार केला नव्हते.

ओमकार यांनी आयएएस अधिकारी श्रीकर परदेशी यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यांच्यामुळेच ओमकार यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंग केले. तरीही त्यांचे मन सिव्हिल परीक्षेकडेच होते.

Success Story
Success Story : नकोशीनं कुटुंबाचं नाव केलं! सासरच्यांमुळे ती IAS झाली, आता अमरावतीची कलेक्टर; वाचा संजीता महापात्रा यांचा प्रवास

सलग ४ वेळा अपयश

ओमकार यांनी खूप मेहनतीने अभ्यास केला. त्यांना चांगल्या पगाराची नोकरी होती. परंतु त्यांनी नोकरी सोडून यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्यांदा २०१५ मध्ये परीक्षा दिली होती. त्यांना सलग ४ वेळा अपयश आले. शेवटी २०२० मध्ये त्यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली. परंतु तरीही त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी २०२२ मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि ते आयएएस अधिकारी झाले.

Success Story
Success Story: दोन मुलांची आई, घर संसार सांभाळात झाली IAS; पुष्पलता यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com