Success Story: दोन मुलांची आई, घर संसार सांभाळात झाली IAS; पुष्पलता यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IAS Pushpalata Yadav: आयएएस पुष्पलता यादव यांनी घर, संसार सांभाळून यूपीएससी परीक्षा पास केली. दोन प्रयत्नात अपयश मिळाले. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही. तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS पुष्पलता यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

घर, संसार आणि मुलं सांभाळून दिली UPSC परीक्षा

दोन प्रयत्नात अपयश

स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षणासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते. तुम्ही कोणत्याही वयात आपले स्वप्न पूर्ण करु शकतात. अनेकदा मुलींच्या लग्नानंतर त्यांना घर, संसार आणि मूल एवढंच त्यांचं जग असल्याचं भासवलं जातं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊनदेखील स्त्री खूप काही करु शकते.याच निश्चय पुष्पलता यादव यांनी केला आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यांनी लग्नानंतर यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story : नकोशीनं कुटुंबाचं नाव केलं! सासरच्यांमुळे ती IAS झाली, आता अमरावतीची कलेक्टर; वाचा संजीता महापात्रा यांचा प्रवास

आयएएस पुष्पलता यादव या मूळच्या हरियाणाच्या आहेत. त्यांनी लग्नानंतर स्त्री खूप काही करु शकते, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. त्यांचा निश्चय, मेहनत आणि कुटुंबाच्या साथीने त्यांनी हे यश मिळवलं आहे.

पुष्पलता यादव कोण आहेत? (IAS Pushpalata Yadav)

पुष्पलता यादव या हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी २०१७ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी लग्नानंतर ६ वर्षांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी बायको, सून आणि आई या सर्व जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्या. त्यांना दोन मुले आहेत.

पुष्पलता या बँकेत नोकरी करायच्या.परंतु त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न नाही सोडले. पुष्पलता यांचे शिक्षण गावातील शाळेत झाले. शिक्षण झाल्यानंतर लगेचच त्यांचे लग्न झाले. यानंतर त्या प्रायव्हेट कंपनीत काम करत होत्या. यानंतर स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. लग्नानंतर त्यांनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या.

Success Story
Success Story: ऑनलाइन फुले विकून उभारली कोट्यवधींची कंपनी; दोन बहिणींची यशोगाथा वाचा

लग्नानंतर केले शिक्षण पूर्ण

लग्नानंतरही त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सासरच्यांनी त्यांनी सपोर्ट केला. त्यांनी २०१६ मध्ये बीएससी डिग्री प्राप्त केली. यानंतर त्यांनी एमबीए केले.

पुष्पलता यांनी कुटुंबाच्या सपोर्टमुळे परीक्षेची तयारी केली. त्या जेव्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या तेव्हा त्यांचा नवरा २ मुलांची काळजी घ्यायचा. सासूबाईंनी खूप सपोर्ट केला. पुष्पलता यांना दोन प्रयत्नात अपयश मिळाले. तरीही त्यांनी हार मानली नाही. शेवटी २०१७ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story : १७ हजारात व्यवसाय उभारला, सहा महिन्यात १५ लाखांचा नफा; जयपूरमधील दोन बेस्टफ्रेंडची सोशल मीडियावर चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com