सध्या दिवाळी सुरु झाली आहे. दिवाळी म्हटल्यावर घरात फुले ही आणली जातात.लग्नासाठी तर खूप मोठ्या प्रमाणात फुले आणली जातात. यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते. त्यात जर घराच्या जवळ फूल विकणारे कोणीही नसेल तर खूप समस्या येतात. हाच प्रॉब्लेम लक्षात घेऊन यशोदा करुतुरी आणि रिया या दोन बहिणींनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला.
सध्या बाजारातील प्रत्येक वस्तू ऑनलाइन डिलिव्हरी अॅपद्वारे आपल्या घरी येते. यामध्ये किराणा सामानापासून ते दूधापर्यंतचा समावेश असतो. परंतु आतापर्यंत फूलांची डिलिव्हरी करणारे कोणतेही अॅप बाजारात नव्हते. हीच आयडीया घेऊन त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरु केला. (Business Succes)
बेंगळुरुच्या रहिवाशी यशोदा आणि रिया यांनी २०१९ मध्ये स्वतः चा स्टार्टअप सुरु केला. हूवु या नावाने त्यांनी बिझनेस सुरु केला. हुवू या शब्दाचा कन्नड भाषेत अर्थ फूल असा होतो. त्यामुळे त्यांनी आपल्या बिझनेसचं नावदेखील हुवू ठेवलं.या स्टार्टअपमुळे घरोघरी फूलांची डिलिव्हरी होऊ लागली. फुलांसोबत अगरबत्तींचीदेखील डिलिव्हरी होऊ लागली. आज या कंपनीची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
यशोदा आणि रिया यांचे वडील गुलाबाची शेती करायचे. त्यामुळे त्यांचे फुलांशी एक वेळेच नाव होते. त्यांच्या शेताला ९० च्या दशात सर्वात मोठे गुलाबाचे शेत म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळेच त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही बहिणींनी १० लाख रुपयांचा फंड मिळवला आणि स्वतः टा व्यवसाय सुरु केला. त्यांनी फुलांच्या डिलिव्हरीसाठी सबस्क्रिप्शन मॉडेलदेखील लाँच केले.यशोदाने अमेरिकेतून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तिने भारतातील फुलांची डिमांड ओळखली. इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक फुलांची मागणी आहे, हे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी व्यवसाय सुरु केला. (Success Story)
फुलांची योग्य पद्धतीने काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जर योग्यरितीने काळजी घेतली नाहीतर फुले लवकर कोमेजतात. त्यामुळे त्यांनी केरळ, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यानंतर या फुलांची पॅकिंग अशा पद्धतीने केली जाते की ती फुले १५ दिवसांपर्यंत ताजी राहतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.