शिक्षण विभागाची मोठी कारवाई; बारावी परीक्षा केंद्रावरील ६ शिक्षक सस्पेंड, काय आहे प्रकरण?
जालन्यात बारावीच्या पहिल्या पेपरदरम्यान कॉपीचा प्रकार उघड
जालनाच्या अंबड तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळलाय
कॉपी प्रकरणी सहा शिक्षकांचं निलंबन
अक्षय शिंदे,साम टीव्ही
राज्यातील विविध जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा सुरू आहेत. काल बारावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर झाला. परीक्षेदरम्यान राज्यातील एकूण ४२ ठिकाणी कॉपीचे गैरप्रकार आढळले. सीसीटीव्हीमधूनही कॉपीचे गैरप्रकार समोर आले. जालन्यातही बारावी परीक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहा शिक्षकांचे निलंबन करण्यात आली आहे.
जालन्यात शिक्षण विभागाने सहा शिक्षकांवर कारवाई करताना निलंबनाचे आदेश काढले. बारावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी अंबड तहसीलदारांच्या पथकाने कारवाई केली. जालन्यातील अंबड तालुक्यातील जांबुवंत विद्यालय रोहिलागड, प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक विद्यालय शहागड, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ विद्यालय अंकुश नगर या शाळेत कॉपीचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी या तिन्ही परीक्षाकेंद्रावरील पर्यवेक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्येही कॉपी प्रकरण समोर
छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्गात विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्याच इंग्रजी पेपरला बोर्डानं लावलेल्या सीसीटीव्ही समोर बसूनच सामूहिक कॉपी केल्याचा प्रकार समोर आलाय. परीक्षेला बसले विद्यार्थ्यांसहित परीक्षा केंद्रावरचे केंद्रप्रमुख शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणी बोर्ड आणि शिक्षण विभागाने कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
कॉपी प्रकरणी १९ कर्मचाऱ्यांवर देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समोर आलं आहे. तसेच तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

