जमीन थरथरली, अचानक गूढ आवाज; भूकंपाच्या धक्क्याने ८ गावातील नागरिक भयभीत, काही जणांची धावाधाव

Nanded Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने नांदेडमधील ८ गावातील नागरिक भयभीत झालेत. या भूकंपाच्या धक्क्याने अनेकांची धावाधाव झाली.

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सात ते आठ गावांना 3.15 मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. जमिनीतून गूढ आवाज आणि जमीन हादरल्याचे गावकऱ्यांनी अनुभवले. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील, हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज गावात भूकंप आला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंदविण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील खपराळा गावात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाने गावातील नागरिकांमध्ये एकच भीती पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com