Success Story: आईला कॅन्सर, लेक बनली ताकद; खडतर परिस्थितीवर मात करत झाली IAS; पल्लवी वर्मा यांचा प्रवास

Success Story of IAS Pallavi Verma: आयएएस पल्लवी वर्मा यांनी सातव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांच्या आईला कॅन्सर होता. परंतु ही परिस्थितीदेखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळली. त्यांनी शेवटी आपले स्वप्न पूर्ण केले.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IAS पल्लवी वर्मा यांचा प्रवास

७व्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

आईला होता कॅन्स

प्रत्येकाची काही न काही स्वप्ने असतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. मेहनतीचे यश हे आपल्याला नक्कीच मिळते. असंच काहीसं पल्लवी वर्मा यांच्यासोबत झालं. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केली. परिस्थिती कशीही असली तरीही त्यावर मात करता यायला हवी,याचे उत्तम उदाहरण म्हणजे पल्लवी वर्मा आहेत.

Success Story
Success Story: जिद्द! काम करता करता केला अभ्यास; तीनदा अपयश; चौथ्या प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IFS पूज्य प्रियदर्शिनी यांचा प्रवास

पल्लवी वर्मा यांच्या आईला कॅन्सर झाला होता. कॅन्सर झाल्यानंतर कुटुंबात खूपच टेन्शनचे वातावरण होते. परंतु अशा परिस्थितीही पल्लवी यांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला. खंबीरपणे सर्व परिस्थिताला समोऱ्या गेल्या. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ७ व्या प्रयत्नात यश मिळवले.

पल्लवी वर्मा या मूळच्या इंदौरच्या रहिवासी आहेत. त्यांनी बायोटेक्नोलॉजीमधून ग्रॅज्युएशन केले. पल्लवी या कुटुंबातील पहिल्या व्यक्ती आहेत ज्यांनी युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम केले. परंतु त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते.

पल्लवी यांनी २०१३ पासून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. २०१३ ते २०२० पर्यंत खूप परीक्षा दिली. तीन वेळा त्या प्रीलियम्समध्ये फेल झाल्या. तीन वेळा इंटरव्ह्यूमध्ये त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. ६ वेळा अपयश मिळूनही त्यांनी हार मानली नाही.

Success Story
Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

पल्लवी यांच्या प्रवासात खूप अडचणी आल्या. आई आजारी असतानाही त्यांनी आपल्या परीक्षेवर काही परिणाम होऊ दिला नाही. त्यांची आई केमोथेरेपीमधून जात होती. आईला त्रासात असताना पाहून पल्लवी यांना खूप त्रास व्हायचा. परंतु त्यांनी हार मानली नाही. ७ वर्षांच्या मेहनतीनेतर त्यांनी हे यश मिळवले.

Success Story
Success Story: ९ तासांची शिफ्ट, कॅबमध्ये अभ्यास, २३ लाखांच्या पगाराची नोकरी सोडली, पाचव्या प्रयत्नात IAS; काजल जावला यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com