Shreya Maskar
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मनमाडजवळ अंकाई हा एक प्राचीन व मजबूत किल्ला आहे. सातमाळा डोंगररांगेत अंकाई-टंकाई हे जुळे किल्ले आहेत.
अंकाई-टंकाई हे जुळे किल्ले एकाच खिंडीने वेगळे झालेले दोन स्वतंत्र डोंगर असून, सुरत-औरंगाबाद व्यापार मार्गाच्या संरक्षणासाठी यादव काळात बांधले गेले होते.
अंकाई किल्ल्यात राजवाड्याचे अवशेष, अनेक पाण्याची टाकी, आणि धान्य कोठारे पाहायला मिळतात. अंकाई किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे.
अंकाई किल्ला अत्यंत भक्कम आहे. ज्याच्या चारही बाजूंना कडा असून वर जाण्यासाठी ७ तटबंदींचे वेढे आहेत.
अंकाई किल्ला यादव काळात बांधलेला हा किल्ला पुढे मुघल आणि नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात होता. किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे.
अंकाई किल्ल्यावर मध्यभागी एक मोठी चौकोनी पाण्याची टाकी आहे, ज्याच्या मध्यभागी प्राचीन मूर्ती आहे. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर 'काशी तलाव' आहे, ज्याच्या मध्यभागी कोरलेल्या खडकात एक पवित्र तुळशी वृंदावन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.