खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

Rupali Chakankar Faces First SIT Probe In Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची SIT कडून सखोल चौकशी करण्यात आली. IPS सातपुतेंनी नेमके कोणते प्रश्न विचारले याची माहिती समोर आली आहे.
Rupali Chakankar leaves after SIT interrogation in the Ashok Kharat case, says she has cooperated fully with investigators.
Rupali Chakankar leaves after SIT interrogation in the Ashok Kharat case, says she has cooperated fully with investigators.saam tv
Published On

राज्यभर गाजत असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादीच्या माजी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची आज पहिल्यांदाच चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तासांपासून SIT कडून त्यांची चौकशी सुरू होती. त्यामुळे SIT ने रूपाली चाकणकर यांना नेमके कोणते प्रश्न विचारले आणि नेमकी काय चौकशी झाली? याबाबत आता माहिती समोर आली आहे. SIT पथकापासून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. याआधी SIT ने चाकणकर यांना चौकशीसाठी नोटिस बजवल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र त्यांनी नकार देत मला कुठलीही नोटिस आली नसल्याचे सांगितले होते. शेवटी त्यांना SIT समोर चौकशीला सामोरे जावे लागले.

Rupali Chakankar leaves after SIT interrogation in the Ashok Kharat case, says she has cooperated fully with investigators.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अशोक खरात प्रकरणात एसआयटी पथकाकडून अद्यापही चौकशी सुरू असून वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. त्यातच, यापूर्वी रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची एसआयटीने चौकशी केली असून पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारासंदर्भात ही चौकशी झाल्याची माहिती आहे. आता, प्रत्यक्ष रुपाली चाकणकर यांची देखील आज चौकशी झाली. त्यानंतर, त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

Rupali Chakankar leaves after SIT interrogation in the Ashok Kharat case, says she has cooperated fully with investigators.
Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

तपास यंत्रणांना आवश्यक असलेले सर्व सहकार्य मी केले आहे. एसआयटी (SIT) चौकशीत मी माझी बाजू सविस्तरपणे मांडली असून, सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आहेत. या चौकशीचा सविस्तर अहवाल लवकरच समोर येईल, असे स्पष्ट करत रुपाली चाकणकर यांनी अधिक भाष्य करणे टाळले आणि त्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या.

Rupali Chakankar leaves after SIT interrogation in the Ashok Kharat case, says she has cooperated fully with investigators.
स्पेशल 420 ! पोलीस अधीक्षक कार्यालयातच भ्रष्टाचार; पोलीस उपनिरीक्षकासह चौघांवर गुन्हा

चौकशीतील प्रमुख प्रश्न (SIT Questions):

एसआयटी पथकाने रुपाली चाकणकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली

अशोक खरातशी संबंध: खरातसोबत नेमके कधीपासून ओळख होती आणि 'शिवनिका' संस्थेवर कार्यरत असताना त्याच्या कारभाराची कल्पना होती का?

पूजा-विधी आणि आर्थिक दुवे: अशोक खरातसोबत केलेल्या पूजा-विधींचे स्वरूप काय होते आणि त्यामागे काही आर्थिक देवाणघेवाण झाली होती का?

फोटो आणि व्हिडिओ: खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील आणि कधीचे आहेत?

संस्थेचे कामकाज: शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये नेमके कोणते निर्णय आणि कामकाज चालत असे?

दोन तासांची सखोल चौकशी:

एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची सुमारे दोन तास प्रत्यक्ष चौकशी केली. या दरम्यान काही गंभीर विषयांवर चर्चा झाली

अशोक खरातच्या मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते?

खरातशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी कोणत्या बँक खात्यांचा वापर झाला?

या संदर्भात चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, आता सर्वांचे लक्ष चौकशीच्या अंतिम अहवालाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com