रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का; सरपंचपदाच्या निवडणुकीत सख्ख्या भावाचा दारुण पराभव

duand nandur news : रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का बसलाय. सरपंचपदाच्या निवडणुकीत सख्ख्या भावाचा दारुण पराभव झालाय.
daund nandur politics
rupali chakankar newsSaam tv
Published On
Summary

रुपाली चाकणकर यांचे बंधू संतोष बोराटे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव

संतोष बोराटे यांच्या पराभवामुळे रुपाली चाकणकरांना धक्का बसल्याचते सांगण्यात येतंय

संतोष बोराटे यांच्या पराभवाची सर्वत्र चर्चा

सागर आव्हाड, साम टीव्ही

राज्यातील काही भागात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीतील धक्कादायक निकाल समोर येताहेत. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव झाला. त्यानंतर आता रुपाली चाकणकर यांच्या सख्ख्या भावाचाही सरपंचपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्यांचा निवडणुकीमधील हा पराभव माजी राज्य महिला आयोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

daund nandur politics
Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

पुण्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली. या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. दौंडच्या नांदूरमधील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याची पाहायला मिळाली. या निवडणुकीत माजी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे सख्खे बंधू संतोष बोराटे यांचा दारुण पराभव झाला आहे.

या निवडणुकीत उमेदवार विशाल नरेंद्र थोरात यांनी तब्बल ३०४ मतांनी विजय संपादन केला. विशाल थोरात यांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपली मोहर उमटवली. थोरात यांच्या विजयामुळे स्थानिक पातळीवर मोठी राजकीय घडामोड घडल्याचे मानले जात आहे.

daund nandur politics
Shocking : सरकारच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबासह शिंदेला अटक

संतोष बोराटे यांच्या पराभवामागे स्थानिक पातळीवरील नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मतदारांमध्ये निर्माण झालेला असंतोष हे प्रमुख कारण असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. निवडणुकीतील पराभवानंतर संतोष बोराटे यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

यवतमाळ जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतीचा निकाल

यवतमाळ जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आलाय. यवतमाळमधील तीन सरपंच आणि पंधरा सदस्यपदासाठी मतमोजणी पार पडली. निकालानंतर नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी जल्लोष करत विजय साजरा केलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत होता. या निवडणुकीत चुरस पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com