Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Ashok Kharat Case: राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते दोन मंत्र्यांवर कारवाई करण्यार असल्याची चर्चा सुरू आहे.
Deputy CM Eknath Shinde
Deputy CM Eknath Shinde Saam Tv
Published On

Summary -

  • राज्य मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता आहे

  • एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर नाराज आहेत

  • भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले

  • अशोक खरातशी कनेक्शन असलेल्या मंत्र्यांवर कारवाईची विरोधकांकडून मागणी

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षातील दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे दीपक केसरकर यांच्यावर आरोप होत आहेत. तसेच काही जिल्ह्यांत पक्षाची ताकद घटल्यामुळे एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्यामुळे नाराजी वाढली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच एकनाथ शिंदे काही मंत्र्यांवर कारवाई करणार असल्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे अनेक मंत्री, आमदार, खासदार आणि काही बडे अधिकारी गेले होते. त्या सर्वांची माहिती समोर आल्यामुळे आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांनी देखील या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणात ज्या मंत्री, आमदारांची नावं समोर आली आहेत आणि अशोक खरातसोबत ज्यांचे फोटो समोर आले आहेत त्या सर्वांविरोधात कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.

Deputy CM Eknath Shinde
Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

अशोक खरात प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दीपक केसरकर यांच्याविरोधात देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधक करत आहेत.

Deputy CM Eknath Shinde
Ashok Kharat: मोठी बातमी! अटकेच्या आधी भोंदूबाबा खरातची 3 IAS अधिकाऱ्यांसोबत बैठक? पाहा VIDEO

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकरणकरांनंतर दीपक केसरकरांचा नंबर असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. तर भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात यांची भेट घेतली होती. माझ्याकडे त्यासंदर्भातील पुरावे आहेत असे त्या म्हणाल्या. पण नीलम गोऱ्हे यांनी ते आरोप फेटाळून लावले.

Deputy CM Eknath Shinde
Ashok Kharat CA: पुण्यातील कोरेगाव पार्कात 18 रो हाऊस, 49 गुंठे जागा; अशोक खरातच्या सीएची संपत्ती ऐकून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com