पृथ्वीवर एलियन्सचं अस्तित्व खरचं आहे का? एलियन्ससंदर्भात पेटगॉनकडे नेमकी कोणती माहिती आहे? हे जगाला पडलेलं एक कोडं खुद्द ट्रम्प प्रशासनानेच सोडवलयं.... अमेरिकेनं एलिय़न्सचे पुरावे देत नेमकं कोणता खुलासा केलाय... पाहूयात या रिपोर्टमधून..
मानवासह असलेली जीवसृष्टी केवळ पृथ्वीतलावरच आहे की या पृथ्वीसारखी सजीवसृष्टी ब्रम्हांडात दुसरीकडेही अस्तित्वात आहे? या प्रश्नाने जगाला अनेक शतकांपासून कोड्यात टाकलयं. वेगवेगळ्या पातळ्यांवर शास्त्रज्ञांचं सशोधन सुरु आहे. त्यातच अमेरिकेनं एलियन्सच्या अस्तित्वाबाबत मोठा खुलासा केलाय...ट्रम्प प्रशासनानं पेंटागॉनच्या अत्यंत गुप्त फाईल्स सार्वजनिक केल्यानं एलियन्सबाबत नवी माहिती समोर आलीय...
ट्रम्प सरकारने तब्बल 170 गुप्त दस्तावेज सार्वजनिक केलेत. ज्यात 1947 आणि 1948 मधील गुप्त अहवालांचा समावेश आहे...पेटागॉनमधून प्रसिद्ध झालेल्या FBIच्या अहवालात 4 फूट उंचीच्या एलियन्सचा उल्लेख आहे...त्याच अहवालात एलियन्स उडत्या तबकडीतून बाहेर येत असल्याची छायाचित्र आहेत...तसंच 2023 मध्ये आकाशात दिसलेल्या नारंगी रंगाच्या गोळ्यांची अर्थात ऑरेंज ओर्ब्सचाही या अहवालात उल्लेख आहे... त्याचबरोबर अमेरिकेच्या एका लष्करी सेन्सरनं समुद्राच्या पृष्ठभागाजवळ ताशी 80 मैल वेगाने 90-अंशाचे वळण घेणाऱ्या एका वस्तूचा मागोवा घेतल्याचाही संदर्भ आहे...
दरम्यान ट्रम्प प्रशासनानं या फाईल्स प्रसिद्ध करताना एलियन्सच्या अस्तित्वावर लवकर अभ्यास करू, असं विधान संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी केलयं...
"आमचे लोक सध्या एलियन्सवर अभ्यास करत आहेत...संशोधनासाठी नक्की किती वेळ लागेल, याबद्दल मला आता सांगता येणार नाही... मात्र आम्ही या कामात पूर्णपणे झोकून देतोय.. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी अद्याप कोणतीही निश्चित माहिती नाही, थोडा धीर धरा... मात्र एलियन्सचं अस्तित्वात आहेत की नाहीत, हे अभ्यासाअंती नक्कीच शोधू"
आता ट्रम्प प्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या फाईल्सकडे संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ आणि UFO तज्ञांचं लक्ष लागलयं.... या फाईल्समध्ये परग्रहांसोबत थेट संपर्क झाल्याचा ठोस पुरावा अद्याप मिळाला नसल्याचं पेंटागॉनचे काही माजी अधिकारी सांगतायत...त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं जारी केलेल्या फाईल्समधील माहितीच्या आधारावर एलियन्सचं अस्तित्व सिद्ध होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे...मात्र जर हे एलियन्स खरचं अस्तित्वात असतील तर मानवी इतिहासातील ही सर्वात मोठी घटना ठरेल, हे निश्चित...
ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.