पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?

Neral-Shirur Highway Project : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नेरळ-शिरूर चारपदरी महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली. १२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होणार आहे.
Neral-Shirur Highway Project
Neral-Shirur Highway ProjectSaamtv
Published On

Neral Shirur highway latest update : मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. कधीकधी ट्रॅफिकमध्ये ४-४ तास जातात, पण आता सरकारकडून ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग तयार केला जाणार आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या महामार्गाला जोडणाऱ्या नेरळ-शिरूर या चारपदरी हायवेच्या कामाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे.

नेरळ-शिरूर महामार्गामुळे नाशिक आणि अहिल्यानगरला झटक्यात जाता येणार आहे. त्याशिवाय मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर होणारी वाहतूककोंडीही कमी होणार आहे. या नव्या महामार्गामुळे मुंबईहून थेट अहिल्यानगरला जाण्यासाठी नवीन पर्याय मिळेल. नेरळ-शिरूर या नव्या चारपदरी महामार्गावर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूकीकोंडी कमी होईल. कारण, मुंबईहून अहिल्यानगरला जाण्यासाठी अनेकजण मुंबई-पुणे या महामार्गाचा वापर करतात, त्यांच्यासाठी आता नवा महामार्ग तयार करण्यात येत आहे.

Neral-Shirur Highway Project
पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

पायाभूत सुविधा समितीने मार्च २०२५ मध्ये नेरळ-शिरूर या नव्या महामार्गाला मंजुरी दिली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या भूसंपदनासाठी १२०० कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आळी आहे. नेरळ-शिरूर हा महामार्ग खासगीकरणाच्या माध्यामतून तयार केला जाणार आहे. सरकारकडून आता लवकरच भूसंपादन सुरू केले जाईल. अमोल कोल्हेंसह पुण्यातील अनेक नेत्यांनी या महामार्गासाठी पाठपुरावा केला होता.

Neral-Shirur Highway Project
राजकारणात खळबळ! शिंदेंच्या शिवसेना नेत्याला अटक; साक्षीदाराचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून चारपदरी महामार्गाची सुरुवात होणार आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर शिरूर येथे हा महामार्ग संपेल. या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे कामाला सुरूवात होईल. भीमाशंकर अभयारण्य आणि वन जमिनीचे मोठे क्षेत्र या महामार्गात असल्याने परवानग्यांची अवश्यकता लागणार आहे. खेड एसीझेड, तळेगाव, चाकण, रांजणगाव आणि सुपा औद्योगिक क्षेत्रांना याचा फायदा होईल.

Neral-Shirur Highway Project
Sambhajinagar Accident : हळदीला जाताना काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत इंजिनिअरिंग विद्यार्थिनीचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com