Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

Ladki Bahin Yojana Status Check : लाडकी बहीण योजनेचा ₹१५०० हप्ता बंद झाला का? तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे आता एका क्लिकवर तपासा.
Ladki Bahin scheme status check
Women check Ladki Bahin Yojana beneficiary status online amid delay in ₹1500 installments in Maharashtra.Saam TV Marathi News
Published On

How to check Ladki Bahin Yojana beneficiary status : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिल आणि मे महिन्यांच्या हप्त्याची राज्यातील महिला अतुरतेने वाट पाहत आहेत. ईकेवायसीमुळे मागील २ महिन्यांपासून लाडकीच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही. ३० एप्रिलपर्यंत ईकेवायसीत बदल करता येत होता, आता सरकारकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ५४ लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद झाले अथवा लाभ बंद झाला आहे. या यादीत तुमचे नाव आहे का? तुमचा १५०० रूपयांचा लाभ सुरू आहे का? योजनेतून तुमचे नाव वगळण्यात तर आले नाही ना? याबाबतची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊयात..

योजनेत तुमचं नाव आहे का? ‘या’ वेबसाइटवर शोधा

लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू राहणार का? १५०० रूपयांचा हप्ता बंद झाला का? हे तपासण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अवघ्या काही मिनिटांत तुम्हाला स्टेट्‍स तपासता येणार आहे. त्यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा. ‘अर्जदार लॉगिन’ या पर्यायावर क्लिक करून मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. पासवर्ड विसरला असाल तर तो पुन्हा जनरेट करा. त्यानंतर ‘लाभार्थी यादी’ किंवा ‘अर्जाची स्थिती’ हा पर्याय निवडा. त्यानंतर आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यावर आपले नाव त्या यादीत आहे की नाही, हे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

Ladki Bahin scheme status check
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ₹३००० जमा होणार, हप्त्याची संभाव्य तारीख आली समोर, वाचा अपडेट
Ladki Bahin Yojana Status Check
Ladki Bahin Yojana Status CheckLadki Bahin Yojana

तुमचा हप्ता बंद तर झाला नाही ना?

३० एप्रिलनंतर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी करण्यात येत आहे. योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांचे आर्थिक मदत दिली जाईल. मे महिन्यापासून निकषांत अपात्र ठरलेल्या सर्व महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास कार्यालयाकडून देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, लाभ बंद झालेल्या महिलांची संख्या जवळपास ५४ लाख इतकी आहे, तर १ कोटी ८९ लाख लाडक्या बहि‍णींना प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin scheme status check
Ladki Bahin Yojana : किती लाडक्या बहि‍णींना ₹१५०० चा हप्ता मिळणार? ईकेवायसीनंतर मोठी अपडेट समोर

लाडकीच्या खात्यात ३००० हजार येणार की ४५०० रूपये येणार?

राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी जमा झाला होता. पण त्यानंतर लाडक्या बहि‍णींना अद्याप १५०० रूपयांचा लाभ मिळालेला नाही. मे महिन्याची १० तारखी उजाडली आहे, पण लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला लाडकीच्या खात्यात १५०० रूपयांचा सन्मान निधी जमा होईल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. पण आता तिसरा महिनाचा दुसरा आठवडा सुरू झालाय, पण लाडकीच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. मार्च-एप्रिल महिन्याचे 3000 रूपये एकत्र येणार का? की ३ महिन्यांचा हप्ता एकाचवेळी जमा होणार... याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहि‍णींना लागली आहे. सरकार लवकरच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात सन्मान निधी जमा करेल, असा अंदाज वर्तवला जातोय.

Ladki Bahin scheme status check
Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com