Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मार्च-एप्रिलच्या हप्त्याची महत्त्वाची अपडेट

Ladki Bahin Yojana March-April Installment Update : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या मार्च-एप्रिल हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थींना ₹१५०० मिळणार की ₹३००० एकत्र जमा होणार? जाणून घ्या हप्ता कधी खात्यात जमा होणार?
Ladki Bahin scheme payment update Maharashtra
Ladki Bahin Yojana March-April Installment Update Saam Tv
Published On

Maharashtra Ladki Bahin scheme March April installment update : ईकेवायसीची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर राज्यभरातील लाडक्या बहि‍णींना मार्च-एप्रिल महिन्यांचा हप्ता कधी मिळणार? अशी चर्चा सुरू झाली. लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर फेब्रुवारीमध्ये अखेरचा हप्ता जमा झाला होता. आता मे महिन्यातील ४ तारीख उजाडली आहे, पण हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लाडक्या बहि‍णींच्या खात्यात २ हप्त्याचे एकत्र पैसे येणार का? की फक्त मार्च महिन्यांचा हप्ता येणार? यासारख्या चर्चा सुरू झालेले आहेत. (mukhyamantri majhi ladki bahin yojana Update)

३ हजार की १५०० रूपये, लाडकीच्या खात्यात किती पैसे येणार? will Ladki Bahin beneficiaries get 3000 rupees together

ईकेवायीसनंतर राज्यातील ५४ लाख महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमचा बंद झाला आहे. १ कोटी ८९ लाख महिलांना आता प्रत्येक महिन्याला खात्यात १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. पण लाडक्या बहि‍णींच्या खात्यात कोणत्या आणि किती महिन्यांचे पैसे जमा होणार? हा प्रश्न प्रत्येक पात्र महिलांना पडला आहे.

Ladki Bahin scheme payment update Maharashtra
Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

मार्च, एप्रिल आणि मे.. या ३ महिन्यांचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. काही महिलांच्या खात्यात जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांचाही हप्ता जमा झालेला नाही, अशा तक्रारी समोर आल्या आहेत. त्या महिला अपात्र ठरल्या आहेत का? पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त मार्च महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होणार का? की सरकार एकत्र ३ हजार रूपयांचे गिफ्ट देणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (when will Ladki Bahin installment be credited May date)

Ladki Bahin scheme payment update Maharashtra
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाचवेळी खात्यात खटाखट ₹४५०० येणार? वाचा अपडेट

लाडकीच्या खात्यात हप्ता कधी जमा होणार? Good News Expected for Ladki Bahin Scheme: Pending Installments May Be Credited by May 10

बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका होत्या. त्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, असे काही जणांकडून सांगण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणीना सरकारकडून लवकरच गुड न्यूज मिळणार आहे. कारण, या आठवड्यातच लाडक्या बहि‍णींसाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे.

Ladki Bahin scheme payment update Maharashtra
लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी महिलांकडे केली शरीरसुखाची मागणी; महाराष्ट्रात संतापाची लाट

मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक असेल. या बैठकीत लाडक्या बहि‍णींच्या हप्त्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे मे महिन्याच्या १० तारखेपर्यंत लाडकीला ३००० हजार रूपयांचे गिफ्ट मिळू शकते.

Ladki Bahin scheme payment update Maharashtra
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा ₹१५०० चा लाभ कायमचा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com