'जय श्री राम'च्या घोषणा बंद करा, भाजप मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना केलं शांत; सुवेंदू अधिकारी असे का म्हणाले?

Suvendu Adhikari : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी टागोर स्मारकातील कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांना ‘जय श्री राम’च्या घोषणा थांबवण्यास सांगितले.
West Bengal CM
Suvendu AdhikariSaam Tv
Published On

Suvendu Adhikari Latest News : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलेय. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमधील विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जोरासांको ठाकूरबारी येथे एका कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्री येताच भाजप कार्यकर्त्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी त्या सर्वांना शांत केले. ते म्हणाले की, मी सर्वांचा मुख्यमंत्री आहे, 'जय श्री राम' च्या घोषणा बंद करा.. घोषणा देण्याची ही जागा नाही. ही राजकीय कुरघोडीची वेळ नाही.

सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर काही वेळातच ते रवींद्रनाथ टागोर यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जोरासांको ठाकूरबारी येथे गेले होते. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' च्या घोषणा सुरू केल्या. यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, पुढे मोठी जबाबदारी आहे. ज्यांना राजकीय कुरघोडी करायची आहे, त्यांनी ती करत राहावी, आम्ही पुढे वाटचाल करू.

West Bengal CM
पुण्याला मिळणार आणखी एक महामार्ग, राज्य सरकारने १२०० कोटींच्या प्रकल्पाला दिली मंजुरी, कुठून जाणार हायवे?
मी कोणतीही वादग्रस्त टिप्पणी करणार नाही. मी मुख्यमंत्री आहे. आता मी सर्वांचा आहे. पश्चिम बंगालने आधीच खूप काही सोसले आहे. शिक्षण आणि संस्कृती नष्ट झाली आहे. आपण एकत्र येऊन बंगालची पुनर्बांधणी करूया.
सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री

कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राऊंडवरील शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी थेट जोरासांको येथे पोहोचले. त्यांनी टागोर यांच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकून हात जोडत आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना ते पत्रकारांना म्हणाले, " गुरुदेवांना आदरांजली वाहून मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. बंगाल आणि बंगाली संस्कृती गुरुदेवांच्या जाणीव आणि आदर्शांनी प्रेरित असली पाहिजे. आज त्या शुभ सुरुवातीचा दिवस आहे."

West Bengal CM
पंजाबच्या कॅबिनेट मंत्र्यांना ईडीने ठोकल्या बेड्या, १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सुवेंदू अधिकारी बोलत असतानाच अचानक गर्दीतून 'जय श्री राम'च्या घोषणा घुमू लागल्या. अधिकारींनी तात्काळ प्रतिसाद देत गर्दीला अशा घोषणा थांबवण्यास सांगितले. ते म्हणाले, 'जय श्री राम'चा जयघोष करण्याची ही जागा नाही, येथे केवळ 'कविगुरू'च्या नावाचा जप केला जातो. सर्वांनी शांत राहावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com