Suvendu Adhikari CM Oath : सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, मोदी-शाहांच्या उपस्थितीत झाला शपथविधी

CM Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर सुवेंद्र अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित होते.
SUVENDU ADHIKARI TAKES OATH AS WEST BENGAL CHIEF MINISTER AFTER BJP HISTORIC WIN
SUVENDU ADHIKARI TAKES OATH AS WEST BENGAL CHIEF MINISTER AFTER BJP HISTORIC WINSaam Tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला.

  • सुवेंद्र अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

  • शपथविधी सोहळा कोलकत्यात पार पडला.

  • नरेंद्र मोदी आणि अमित शहा या सोहळ्यास उपस्थित होते.

  • बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पश्चिम बंगालच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडली असून भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तब्बल १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवी यांनी सुवेंदू अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या सोहळ्यामुळे कोलकात्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शपथविधीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकात्यात रोड शो करत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली.

SUVENDU ADHIKARI TAKES OATH AS WEST BENGAL CHIEF MINISTER AFTER BJP HISTORIC WIN
Shocking : भयानक! चैन खेचून रेल्वे थांबवली अन् तरूणीला जबरदस्ती नेलं; ६ जणांनी केला सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निकालानंतर शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली होती. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले होते.

SUVENDU ADHIKARI TAKES OATH AS WEST BENGAL CHIEF MINISTER AFTER BJP HISTORIC WIN
Shocking : भरमंडपात रक्ताचा सडा, मेहुणीच्या लग्नात भाऊजीची हत्या, साडूनेच केला घात

सुवेंदू अधिकारी यांची राजकीय पार्श्वभूमीही मजबूत मानली जाते. त्यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सुवेंदू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले आणि पक्षातील प्रभावशाली नेते बनले. सिंगूर आणि नंदीग्राम आंदोलनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला. ममता बॅनर्जी यांचा दोनदा पराभव करत सुवेंदू अधिकारी यांनी स्वतःला बंगालमधील प्रभावशाली नेता म्हणून सिद्ध केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेला हा विजय पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठा टप्पा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com