Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा

4 Youths Die While Swimming In Amravati: अमरावतीमध्ये चौघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोघे सख्खे बहीण-भाऊ होते. मृत १२ ते २१ वयोगटातील होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
4 Youths Die While Swimming In AmravatiSaam Tv
Published On

Shocking:

  • अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू

  • मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश

  • मृत १२ ते २१ वयोगटातील होते

  • अमरावतीच्या घातखेडा तलावात ही घटना घडली

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये तलावात बुडून चौघांचा मृत्यू झाला. सुट्ट्या असल्याने हे सर्वजण पोहण्यासाठी तलावावर गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघांचा तलावात बुडून मृत्यू झाला. अमरावतीच्या घातखेडा तलावामध्ये ही घटना घडली. मृतांमध्ये सख्ख्या बहीण-भावाचा समावेश आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये पोहायला गेलेल्या दोन बहीण- भावांसह चौघांवर काळाने झळप घातली. तलावामध्ये बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे चौघेही अमरावतीच्या खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

या घटनेची माहिती मिळताच तलावावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (वय १६ वर्षे), आदित्य नरेंद्र जोशी (१२ वर्षे), पायल बबलू पंडीत (वय २१ वर्षे) आणि यश गजानन काकणे (वय १३ वर्षे) यांचा समावेश आहे. यामधील सोनाली आणि आदित्य सख्खे बहीण-भाव होते. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे जोशी कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. चौघेही तलावामध्ये पोहण्यासाठी उतरले पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
Shocking: न्यायालयातच वकिलाची आत्महत्या, ५ व्या मजल्यावरून मारली उडी; सुसाईड नोट सापडली

नाशिकच्या मनमाडमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू झाला. नातेवाईकाच्या लग्नासाठी हा तरुण नाशिक येथून मनमाडला आला होता. यावेळी हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये तो मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पण पोहताना अचानक तो बुडू लागला. त्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात आले आणि सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. या ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

Amravati: सख्ख्या बहीण-भावासह चौघांचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा
Shocking: रेल्वे रूळ ओलांडताना महिला मालगाडीखाली आली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com