Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Hyderabad Crime: हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने तलावात उडी मारून आत्महत्या केली. या तरुणाच्या बायकोचे अनेकांसोबत विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाने आत्महत्या केली.
Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
Hyderabad Crime Saam Tv
Published On

Summary -

  • हैदराबादमध्ये ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

  • तरुणाच्या बायकोचे अनेकांसोबत विवाहबाह्य संबंध होते

  • आत्महत्येपूर्वी तरुणाने १९ पानांची सुसाईड नोट लिहिली होती

  • पोलिसांनी बायको आणि तिच्या मित्राला अटक केली

हैदराबादमध्ये एक हादरवून टाकणारी घटना घडली. एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने तलावात उडी मारून आत्महत्या केली. एम सीताराम रेड्डी असं या इंजिनिअरचे नाव होते. त्याच्या बायकोचे अनेकांसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे मानसिक तणावाखाली जाऊन या तरुणाने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. या तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली १९ पानांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली तेव्हा त्याच्या आत्महत्येमागचं खरं कारण समोर आले. या सुसाइड नोटमध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती. सीताराम रेड्डीने हैदराबादच्या हुसैन सागर तलावात उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना या तरुणाने लिहिलेली १९ पानांची सुसाईड नोट सापडली. यामध्ये त्याने बायकोवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप केले आहेत. बायकोचे अनेकांसोबत विवाहबाह्य संबंध होते. याच त्रासाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी इंजिनिअरची बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली.

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
Shocking: थरारक! तरुणाने मंदिरात जाऊन गुप्तांग कापलं, दर्शनासाठी आलेले भाविक आतील दृश्य पाहून हादरले

३६ वर्षीय सीताराम रेड्डी हा हैदराबादमधील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करत होता. सीताराम आणि त्याच्या बायकोला दोन मुलं आहेत. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. पण बायकोच्या विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. आत्महत्येपूर्वी त्याने १९ पानांची सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये त्याने गेल्या १८ महिन्यांपासून बायकोचे अनेक पुरुषांशी विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता.

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
Shocking: न्यायालयातच वकिलाची आत्महत्या, ५ व्या मजल्यावरून मारली उडी; सुसाईड नोट सापडली

त्याच्या बायकोचा एक प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बायकोच्या रमण्णा नावाच्या एका मित्राने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. सीतारामने तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहिला होता. हा व्हिडीओ पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. बायकोच्या या कृत्यामुळे होणारा मानसिक त्रास आणि सामाजिक बदनामी सहन होत नसल्याचे त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली.

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com