Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

Software Engineer Couple Suicide: बेंगळूरमध्ये दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर जोडप्यानं आत्महत्या केली. पतीने आपल्या खोलीत आत्महत्या केली. त्यानंतर पत्नीने अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं.
Software Engineer Couple Suicide
Software Engineer Couple Suicidesaam tv
Published On
Summary
  • बेंगळूरमध्ये इंजिनिअर जोडप्याची आत्महत्या

  • पतीनंतर पत्नीने १७ व्या मजल्यावरून उडी मारली

  • दोघेही तेलंगणाचे रहिवासी

कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कोथनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इंजिनिअर जोडप्याने आत्महत्या केली. मृतांची ओळख भानू चंद्रीर रेड्डी (बाबू रेड्डी) आणि त्यांची पत्नी शाझिया अशी पटली आहे. दोघेही तेलंगणाचे रहिवासी होते. ते एका खासगी कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते.

Software Engineer Couple Suicide
खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना थानीसंद्र मेन रोडवरील भारतीय सिटी, टॉवर-६, निकू होम-०१ येथे घडली. पती भानूने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं. जेव्हा पत्नी शाझियाला बराच वेळ कोणताही आवाज ऐकू आला नाही, तेव्हा ती सावध झाली आणि तिने इमारतीच्या सुरक्षारक्षकांना व शेजाऱ्यांना बोलवून घराचा दरवाजा तोडण्यास सांगितला.

शेजाऱ्यांनी दरवाजा तोडल्यानंतर घरातील दृश्य पाहून शाझियाच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात भानूने गळफास घेतला होता. नवऱ्यानं आत्महत्या केली, आपण सर्वकाही गमावलो आहोत अशी भावना तिच्या मनात आल्यानंतर तिनेही इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं.

Software Engineer Couple Suicide
Shocking: बंद घरामध्ये आढळले चौघांचे मृतदेह, दरवाजा तोडताच आतमधील दृश्य पाहून पोलिसही हादरले

कारण काय?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात वैवाहिक जीवनातील वादामुळे दोघांनी आत्महत्या केली असावी असं म्हटलं जात आहे. या जोडप्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं असावं. या घटनेत पतीच्या आरोग्याच्या समस्यांचा काही संबंध होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. या जोडप्याचे लग्न होऊन नऊ वर्षे झाली होती.

त्यापूर्वी ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सूत्रांनुसार लग्नापासून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. दरम्यान कोथनूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली

डीसीपी (ईशान्य) जी. के. मिथुन यांनी याप्रकरणी माहिती दिली की, पती भानूने खोलीत स्वतःला कोंडून घेऊन आत्महत्या केली. हे पाहून पत्नीही वरच्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारली. आम्हाला मृताची एक सुसाईड नोटही सापडली आहे." जोडप्याच्या घरच्यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर वेगवेगळे गुन्हे दाखल केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com