

भाजप नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू
मध्य प्रदेशमध्ये घडली घटना
महामार्गावर भाजप नेत्याच्या वाहनाला दुसऱ्या वाहनाने दिली धडक
शहडोल- रेवा महामार्गावर घडली घटना
मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्याचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या शहडोल- रेवा महामार्गावर ही घटना घडली. भाजपच नेते राहुल द्विवेदी आणि त्यांचा मित्र अतुल तिवारी हे दोघे दुचाकीवरून जात होते. महामार्गावर झोरा पुलियाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये भाजप नेत्याचा आणि त्यांच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. रविवारी सकाळी महामार्गाच्या कडेला दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्विवेदी आणि अतुल तिवारी हे दोघे एका लग्न समारंभावरून घरी परत येत होते. वाटेमध्येच त्यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. राहुल द्विवेदी आणि अतुल तिवारी यांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले आढळून आले. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा झाला झाला. रविवारी सकाळी अपघाताची बातमी मिळताच भाजप कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी केली. दोघांच्या मृतदेहावर शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिस सध्या अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाचा शोध घेत आहेत. भाजप नेते राहुल द्विवेदी हे तिहकी गावचे रहिवासी होते. पोलिसांनी सांगितले की, ते आणि त्यांचा मित्र अतुल शनिवारी रात्री त्यांच्या गावातून झिरिया येथे बाईकवरून गेले होते. ते झिरिया येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून ते घरी परत येत असताना एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. दोघेही सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. ते महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. राहु द्विवेदींच्या मृत्यूमुळे भाजपला धक्का बसला. स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली आहे. या घटनेनंतर भाजपचे पालकमंत्री, आमदार आणि स्थानिक नेत्यांनी कार्यक्रम रद्द केले असून ते देखील राहुल द्विवेदी यांच्या घरी पोहचले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.