Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर

Taj and Trident Hotel Threat Call: मुंबईतील ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. एका तरुणाने धमकीचा फोन केला होता. त्यानंतर मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले.
Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर
Taj and Trident Hotel Threat CallSaam Tv
Published On

Summary -

  • ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला धमकीचा फोन

  • मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवली

  • सायन परिसरातून आरोपी अटक

  • दारूच्या नशेत फोन केल्याची प्राथमिक माहिती समोर

मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली. या धमकीच्या फोननंतर मुंबईत एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आणि परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी तपास करून फोन करून हे दोन्ही हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. धमकीचा फोन करणाऱ्या संशयिताला मुंबई पोलिसांनी सायन परिसरातून अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि ट्रायडेंट हॉटेलला फोन करून दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. फोन करणाऱ्या तरुणाने दावा केला होता की, दहशतवादी हल्ल्यात दोन्ही हॉटेल्सना लक्ष्य केले जाऊ शकते.धमकीचा फोन येताच हॉटेल व्यवस्थापनाने तात्काळ मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही हॉटेल्समधील सुरक्षा वाढवली आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला.

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर
Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणावर भरचौकात जीवघेणा हल्ला, डोक्यात घुसलेल्या कोयत्यासह रुग्णालयात पोहचला; थरारक VIDEO

तपासादरम्यान, पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीने कुठून कॉल केला होता याचा शोध घेतला. धकमी देणारा तरुण मुंबईतील असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्याला सायन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. पोलिस सध्या धमकीमागील हेतू काय होता याचा शोध घेत आहेत. या तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर
Mumbai - Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचा खोळंबा

अशी देखील माहिती समोर आली आहे की, आरोपीने दारूच्या नशेत धमकीचा फोन केला होता. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, आरोपी कौटुंबिक समस्यांमुळे खूप त्रस्त होता. ज्यामुळे त्याने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलले. आरोपी हा हाऊसकीपिंग कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याची पोलिस चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीनंतर नेमकं कारण काय ते समोर येईल.

Mumbai News: ताज आणि ट्रायडेंट हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिस अलर्ट मोडवर
Mumbai : कामाठीपुऱ्याचा चेहरामोहरा बदलणार, म्हाडाने घेतला सर्वात मोठा निर्णय; आता ६५ मजली इमारती उभ्या राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com