Amrut Bharat Express: अयोध्या ते मुंबई अन् वाराणसी ते पुणे अमृत भारत एक्सप्रेस धावणार, कोण-कोणत्या स्टेशनवर असणार थांबा? वाचा

Mumbai Ayodhya Banaras Pune Amrut Bharat Express: महाराष्ट्राला दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस मिळाल्या आहेत.मुंबई ते अयोध्या आणि वाराणसी ते पुणे अशी अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहे.
Amrut Bharat Express
Amrut Bharat ExpressSaam Tv
Published On
Summary

महाराष्ट्राला मिळाल्या २ अमृत भारत एक्सप्रेस

मुंबई ते अयोध्या आणि वाराणसी ते पुणे धावणार

कोणत्या स्टेशनवर थांबणार?

भारतीय रेल्वेने दोन नवीन अमृत भारत एक्सप्रेस सुरु केल्या आहेत. या दोन्ही अमृत भारत एक्सप्रेस मुंबई पुण्यावरुन सुटणार आहे. २८ एप्रिलला या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात झाली आहे. या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या एक्सप्रेस थेट अयोध्या आणि बनारसला जाणार आहे. त्यामुळे मुंबई पुण्याहून तुम्हाला तीर्थक्षेत्राला भेट देता येणार आहे.

Amrut Bharat Express
Smallest Railway station: देशातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कुठे आहे? तुम्ही गेलात का या ठिकाणी

दोन अमृत भारत एक्सप्रेस धावणार (Maharashtra 2 New Amrut Bharat Express)

एक अमृत भारत एक्सप्रेस बनारस ते पुणे हडपसर धावणार आहे तर दुसरी अमृत भारत एक्सप्रेस अयोध्या ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे धावणार आहे. यामुळे भाविकांना खूप फायदा होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या अमृत भारत एक्सप्रेसमुळे काशी विश्वनाथ धाम आणि श्री राम मंदिर अयोध्या यामध्ये कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये जोडली जाणार आहे. त्यामुळे ही ट्रेन भाविकांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

वाराणसी-हडपसर अमृत भारत एक्सप्रेस (Varanasi to Hadapsar Amrut Bharat Express)

वाराणसी ते हडपसर अमृत भारत एक्सप्रेसचा नंबर 02531 असणार आहे. ही ट्रेन बनारसमधून संध्याकाळी निघणार आहे. त्यानंतर मध्यरात्री पुण्यातील हडपसरला पोहचेल.

या स्टेशनवर थांबणार (Varanasi to Hadapsar Amrut Bharat Express Halts)

वाराणसी ते हडपसर वंदे भारत एक्सप्रेस ज्ञानपुर रोड, प्रयागराज, फतेहपुर, गोविंदपुरी, ओरई, विरांगणा लक्ष्मीबाई झासी, रानी कमलापति, नर्मदापुरम, इटारसी, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर, दौंड आणि हडपसर अशा एकूण १८ स्थानकांवर थांबणार आहे.

Amrut Bharat Express
Amrut Bharat Express : दसऱ्यापूर्वीच भारतीय रेल्वेचं मोठं गिफ्ट! महाराष्ट्रातून धावली नवी अमृत भारत ट्रेन, कुठे-कुठे थांबणार?

अयोध्या ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस (Ayodhya to Mumbai Amrut Bharat Express)

अयोध्या ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास २८ तासात पूर्ण होणार आहे. ही ट्रेन १२ स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये अयोध्या, सुल्तानपुर, एमबीडी प्रतापगड, प्रयागराज जंक्शन, सतना, जबलपुर, इटारसी जंक्शन, भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, कल्याण, ठाणे त्यानंतर लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहचणार आहे. या ट्रेनमुळे प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

Amrut Bharat Express
Vande Bharat Train: सिद्धेश्वर एक्सप्रेस ७ तास उशिरा, वंदे भारत ट्रेनही रद्द; रेल्वे अपघातामुळे सोलापूरकडील वाहतूक विस्कळीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com