Vande Bharat Train

Vande Bharat Train Sleeper : लांब पल्ल्याचा प्रवास आता आणखी सुखाचा होणार आहे. वंदे भारत ट्रेनने प्रवास करणे तर त्याहून उत्तम होणार आहे. वंदे भारत रेल्वेगाडीने प्रवास करण्याचा अनुभव जबरदस्त असेल. देशातील पहिली हायस्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच धावणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. या ट्रेनमधून बसूनच नाही, तर झोपून प्रवास करता येणं शक्य झालंय. याशिवाय थकलेल्या प्रवाशांना गरम पाण्याने आंघोळ देखील करता येणार आहे. वंदे भारत ट्रेनची चाचणी सुरुवातीला १० दिवस होणार आहे. प्रत्यक्षात दोन महिने ट्रेनची चाचणी होईल. चाचणी यशस्वी झाल्यानंतर लोकांच्या सेवेत ही ट्रेन दाखल होणार आहे. विशेष म्हणजे राजधानी एक्स्प्रेस इतकेच प्रवासी भाडे असेल, असा अंदाज आहे.
Read More
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com