Vande Bharat : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वंदे भारतसह सर्व रेल्वे गाड्यांतून मोफत प्रवास करता येणार, कोणाला मिळणार हा लाभ?

Vande Bharat Express News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र आणि इतर चक्र पुरस्कार विजेत्यांना आता वंदे भारतसह देशातील सर्व रेल्वे गाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
Vande Bharat Express News
Vande Bharat Express News AI Image
Published On: 

देशासाठी शौर्य गाजवणाऱ्या आणि आपल्या प्राणांची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चक्र मालिकेतील वीरता पुरस्कार मिळवलेल्या जवानांना आता वंदे भारतसह देशातील सर्व रेल्वे गाड्यांमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा काही ठराविक रेल्वे गाड्यांपुरती मर्यादित होती. मात्र, आता सरकारने या सुविधेचा विस्तार केला आहे.

भारतीय लष्कराने बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे वीरता पुरस्कार मिळवलेल्या जवानांना रेल्वे प्रवास करताना अधिक सोय होणार आहे. या नव्या सुविधेमध्ये वंदे भारतसह मेल, एक्स्प्रेस आणि इतर सर्व प्रकारच्या रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Vande Bharat Express News
Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

विशेष म्हणजे, यामुळे पुरस्कार विजेत्यांना यापूर्वी मिळणाऱ्या प्रवासाच्या सुविधा आणि अधिकारांमध्ये कोणताही बदल होणार नाही. केवळ मोफत प्रवासाची सुविधा आता सर्व रेल्वे गाड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र या तीन शौर्य पुरस्कारांची सुरुवात केली होती. हे पुरस्कार १५ ऑगस्ट १९४७ पासून लागू मानले जातात. त्यानंतर अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र या पुरस्कारांचाही समावेश करण्यात आला. देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कारांमध्ये परमवीर चक्राला विशेष स्थान आहे.

Vande Bharat Express News
Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

यापूर्वी या पुरस्कार विजेत्यांना रेल्वेकडून विशेष पास दिले जात होते. या पासच्या माध्यमातून त्यांना ठराविक नियमांनुसार मोफत प्रवास करता येत होता. फेब्रुवारी २०१४ मध्ये परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्यांसाठी राजधानी, शताब्दी आणि दुरंतो यांसारख्या गाड्यांमध्येही सुविधा वाढवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये अशोक चक्र आणि कीर्ती चक्र विजेत्यांनाही मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नव्या निर्णयामुळे ही सुविधा सर्व रेल्वे गाड्यांसाठी लागू होणार आहे. देशासाठी योगदान देणाऱ्या शूर जवानांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.