Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

Winter Chilblains Health Care : हिवाळ्यात हात-पायांची बोटे लाल होणे, सूज येणे, खाज आणि जळजळ जाणवणे ही चिलब्लेन्सची लक्षणे असू शकतात. जाणून घ्या चिलब्लेन्सची कारणे, लक्षणे आणि थंडीपासून बचाव करण्याचे सोपे उपाय.
Chilblains In Winter Symptoms, Causes & Prevention Tips
Chilblains In Winter Symptoms, Causes & Prevention TipsAI Image
Published On: 

हिवाळा सुरू झाला की थंडीमुळे त्वचेच्या अनेक समस्या जाणवू लागतात. काही जणांच्या हाताची बोटे, पायाची बोटे किंवा कान लाल होतात, सुजतात आणि त्याठिकाणी खाजही येऊ लागते. अनेकदा ही लक्षणे किरकोळ समजून दुर्लक्ष केले जाते. मात्र, हा त्रास चिलब्लेन्स (Chilblains) चा प्रकार असू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात या समस्येची लक्षणे ओळखणे आणि वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

चिलब्लेन्सला वैद्यकीय भाषेत 'पर्निओ' असे म्हणतात. थंड आणि दमट वातावरणात त्वचेखालील बारीक रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे हा आजार होतो. विशेषतः हाताची बोटे, पायाची बोटे, नाक आणि कान यांना याचा त्रास होतो. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि तापमानात अचानक बदल झाल्यानंतर त्या वेगाने प्रसरण पावतात. त्यामुळे त्वचेवर सूज आणि जळजळ जाणवू शकते.

Chilblains In Winter Symptoms, Causes & Prevention Tips
Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

या समस्येमध्ये त्वचा लालसर किंवा निळसर दिसणे, बोटांना सूज येणे, खाज सुटणे, जळजळ होणे आणि वेदना जाणवणे अशी लक्षणे दिसतात. काही वेळा फोडही येऊ शकतात.यापासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात बाहेर जाताना हातमोजे, उबदार मोजे आणि योग्य आकाराचे बूट वापरा. तसेच हात-पाय नेहमी कोरडे आणि उबदार ठेवा.मात्र त्यासाठी जर तुम्ही खूप घट्ट मोजे किंवा बूट घालत असाल तर टाळा. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. खूप थंडी जाणवत असेल तर ऊब मिळवण्यासाठी हात-पाय थेट हीटरजवळ धरू नका किंवा गरम पाण्यात बुडवू नका. तसेच नियमितपणे त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर लावा.

Chilblains In Winter Symptoms, Causes & Prevention Tips
Winter Health : थंडीच्या दिवसांत हाताची बोटे सुन्न पडतायत? दुर्लक्ष करणं जीवावर बेतलं, ६ आजारांची असू शकतात लक्षणं

विशेषतः हा त्रास वारंवार होत असेल किंवा जखमा होत असतील तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही वेळा रक्ताभिसरणाशी संबंधित समस्या किंवा ऑटोइम्यून आजारांमुळेही असा त्रास होऊ शकतो. थोडक्यात, हिवाळ्यात हात-पाय उबदार आणि कोरडे ठेवणे, त्वचेची काळजी घेणे आणि थंडी-उष्णतेतील अचानक बदल टाळणे या साध्या गोष्टी चिलब्लेन्सपासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.