Alisha Khedekar
थंडीमुळे हाताच्या बोटांमधील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे बोटे पांढरी, निळसर पडतात आणि सुन्न होऊन वेदना जाणवू शकतात.
रक्तातील साखर वाढल्यामुळे नसांवर परिणाम होऊ शकतो. हातापायांना मुंग्या येणे, जळजळ होणे आणि बोटे सुन्न पडणे अशी लक्षणे दिसतात.
मनगटातील नस दाबली गेल्यामुळे हा त्रास होतो. अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटाला मुंग्या येणे, सुन्नपणा जाणवू शकतो.
मानेच्या मणक्यांमध्ये बदल झाल्यामुळे नसांवर दबाव येऊ शकतो. यामुळे मानदुखी, हातात वेदना आणि बोटे सुन्न होण्याचा त्रास जाणवतो.
शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यास नसांच्या कार्यावर परिणाम होतो. हातापायांना मुंग्या येणे, बधिरपणा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करत असल्यास शरीराची कार्यप्रणाली मंदावते. काही रुग्णांना हात सुन्न होण्याचा त्रास होऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा