Alisha Khedekar
थंडी सुरू झाली की अनेक जण दही खाणं बंद करतात. दही खाल्ल्याने सर्दी आणि खोकला होतो, असा समज आहे. मात्र, थंडीत दही खाणं सुरक्षित आहे.
नाही! दही खाल्ल्याने थेट सर्दी किंवा खोकला होत नाही. सर्दी होण्यामागे प्रामुख्याने विषाणू कारणीभूत असतात.
दह्यामध्ये चांगले जिवाणू असतात. हे जिवाणू पचनक्रियेला मदत करू शकतात. नियमित आणि योग्य प्रमाणात दही खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.
थंडीत दही खायचं असल्यास फ्रिजमधून काढून लगेच खाऊ नका. थोडा वेळ बाहेर ठेवा आणि सामान्य तापमानाला आल्यावर खा. यामुळे खूप थंड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास टाळता येऊ शकतो.
रात्री दही खाल्ल्याने प्रत्येकालाच त्रास होतो, असं नाही. मात्र, काही लोकांना रात्री दही खाल्ल्यानंतर पोटात जडपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
दही खूप दिवस बाहेर ठेवून खाणं टाळा. दही ताजं आणि योग्य पद्धतीने साठवलेलं असावं. खराब झालेलं किंवा विचित्र वास येणारं दही खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा