Alisha Khedekar
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही जणांना जबडा, दात किंवा चेहऱ्याच्या भागात अचानक वेदना जाणवू शकतात.
विशेषतः डाव्या खांद्यामध्ये अचानक वेदना, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवणे हेही संभाव्य संकेत असू शकतात.
डाव्या हातातून खांद्यापर्यंत पसरणारी वेदना किंवा मुंग्या हृदयाशी संबंधित समस्येचा इशारा असू शकतात.
काही वेळा छातीऐवजी वरच्या पाठीमध्ये अचानक दडपण, जळजळ किंवा वेदना जाणवू शकतात.
छातीत दुखत नसतानाही अचानक धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे हे महत्त्वाचे लक्षण ठरू शकते.
कोणतेही कारण नसताना अचानक घाम फुटणे आणि अस्वस्थ वाटणे दुर्लक्षित करू नये.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा