Alisha Khedekar
दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडू शकते आणि किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
कामाच्या घाईत वारंवार लघवी रोखण्याची सवय असल्यास मूत्रमार्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढू शकते.
जेवणात अतिरिक्त मीठ, पापड, लोणची आणि प्रक्रिया केलेले पदार्थ अधिक घेतल्याने रक्तदाब वाढून किडनीवर ताण येऊ शकतो.
चिप्स, इन्स्टंट नूडल्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समध्ये सोडियम जास्त असू शकते. रोजचे सेवन किडनीसाठी चांगले नाही.
डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता वारंवार पेनकिलर घेण्याची सवय किडनीसाठी नुकसानकारक ठरू शकते.
कोल्ड ड्रिंक्स आणि गोड पेयांचे नियमित सेवन वजन, रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढवू शकते, ज्याचा किडनीवर परिणाम होतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा