Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

Gold Silver Rate Today News : जळगावच्या सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोनं प्रतितोळा १२०० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो २००० रुपयांनी महागली. जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर.
Gold Silver Rate Today News
Gold Silver Rate Today News AI Image
Published On: 

संजय महाजन, जळगाव

जळगावच्या सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजही बाजार सुरू होताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार २०० रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

आजच्या वाढीनंतर जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर १ लाख २६ हजार ८०० रुपये झाला आहे. तर चांदीचा दर १ लाख ५८ हजार रुपये इतका पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असून, आजही ही तेजी कायम आहे.

Gold Silver Rate Today News
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

मात्र, मागील तीन दिवसांतील वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर चांगलाच परिणाम होत आहे. लग्नसराई किंवा इतर शुभकार्यांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना वाढलेल्या दरांचा फटका बसण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याने चांदीचे दागिने आणि इतर वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. येत्या काही दिवसांत या दरांमध्ये काय बदल होतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.