Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Gold Silver Price Today Update News : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५५० रुपयांवर पोहोचला.
Gold Rates Today News
Gold Rates Today News AI Image
Published On: 

सोन्या-चांदीच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून दरांमध्ये चढ-उतार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आजच्या सराफा बाजारातील दरानुसार, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १ हजार ७५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीनंतर १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख २६ हजार ५५० रुपयांवर पोहोचला आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदी प्रति १०० ग्रॅममागे ५०० रुपयांनी महागली असून, सध्या तिचा दर १७ हजार रुपयांवर पोहोचला आहे. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेक कुटुंबांकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी केली जाते. मात्र, दरवाढीमुळे खरेदी करताना ग्राहकांना आर्थिक गणित जुळवावे लागणार आहे. सोन्या-चांदीचे दर आणखी वाढणार की पुन्हा घसरणार, याकडे आता ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. एकूणच, लग्नसराईच्या दिवसांत सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे खरेदीदारांची चिंता वाढली आहे.

Gold Rates Today News
Bank Update : १ जानेवारीपासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार? काय आहे नेमकं सत्य? वाचा

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५५

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,०१,२४०

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,२६,५५०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १२,६५,५००

Gold Rates Today News
Mumbai : कबुतरांना दाणे टाकणे महागात पडणार; महापालिका थेट आकारणार दंड

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६००

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९२,८००

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर १,१६,०००

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ११,६०,०००

Gold Rates Today News
Maharashtra : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना, १ लाख रिक्षा मिळणार, आरटीओ फी माफ; कसा घेणार लाभ?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

१ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९१

८ ग्रॅम सोन्याचे आजचे दर ७५,९२८

१० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९४,९१०

१०० ग्रॅम सोन्याचे आजचे दर ९,४९,१००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.