मुंबईतील दादर आणि माहीम चौपाटीवर कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना आता दंड भरावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास मनाई केली असून, नियम मोडणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडून विशेष पावले उचलण्यात आली आहेत.
चौपाटी परिसरात कबुतरांना दाणे टाकण्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. तसेच कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत महापालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारवाईसाठी दोन्ही चौपाट्यांवर पालिकेचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. सकाळी ९ ते ११ आणि दुपारी ४ नंतर काही तास कर्मचारी परिसरात लक्ष ठेवतील. नागरिकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी ठिकठिकाणी सूचना फलकही लावण्यात येणार आहेत.
ऑगस्ट २०२५ मध्ये दादर कबुतरखाना बंद झाल्यानंतर काही नागरिकांनी कबुतरांना दाणे टाकण्यासाठी चौपाटीचा वापर सुरू केला. त्यामुळे परिसरात कबुतरांची संख्या वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.