Indian Railways : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! वंदे भारतमध्ये मिळणार खास सरप्राईज

Mumbai Goa train news : नाताळनिमित्त प्रवाशांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एक खास सरप्राईज प्लॅन करण्यात आलं आहे. रेल्वेच्या या नव्या उपक्रमामुळे सणासुदीचा प्रवास आणखी अविस्मरणीय होणार आहे.
Mumbai to Goa Vande Bharat Express latest news
Mumbai to Goa Vande Bharat Express latest newssaam tv
Published On: 

नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमध्ये गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक आनंददायी आणि संस्मरणीय करण्यासाठी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये खास उपक्रम राबविण्याची तयारी सुरू आहे.

या उपक्रमांतर्गत सांताक्लॉजच्या वेशातील कर्मचारी प्रवाशांचे स्वागत करणार असून, त्यांना चॉकलेट आणि केकचे वाटप केले जाणार आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या उपक्रमाला अद्याप रेल्वे मंडळाची मंजुरी मिळणे बाकी आहे.

Mumbai to Goa Vande Bharat Express latest news
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या किंमतीत पुन्हा मोठी घसरण

रेल्वेच्या डब्यात अनुभवता येणार नाताळचा आनंद

नाताळ आणि नववर्षाच्या काळात गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना प्रवासादरम्यानही नाताळचा उत्साह अनुभवता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी आयआरसीटीसीचे कर्मचारी सांताक्लॉजच्या वेशात प्रवाशांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांना चॉकलेट आणि केक देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे रेल्वेच्या डब्यात उत्सवी वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांची पसंती

जून २०२३ मध्ये मुंबई-मडगाव मार्गावर गोवा आणि कोकण रेल्वे मार्गावरील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. सुरुवातीपासूनच या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास करता येत असल्याने गोव्याला जाणारे पर्यटक या गाडीला विशेष पसंती देत आहेत. विशेषतः सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात या गाडीच्या आरक्षणासाठी मोठी मागणी असते. अनेकदा उपलब्ध आसनांपेक्षा आरक्षणाची मागणी जास्त असल्याने प्रवाशांना प्रतीक्षा यादीचा सामना करावा लागतो.

Mumbai to Goa Vande Bharat Express latest news
New Rules December 2026: १ डिसेंबरपासून खिशाला बसणार फटका? SBI कार्डपासून गॅस सिलिंडरपर्यंत ७ मोठे बदल

डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या गाडीतील डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. सध्या असलेल्या डब्यांची संख्या वाढवून ती २० करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात अधिक प्रवाशांना या गाडीने प्रवास करता येऊ शकतो.

रेल्वे मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नाताळनिमित्त चॉकलेट आणि केकचे वाटप करण्याचा प्रस्ताव आयआरसीटीसीकडून तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी रेल्वे मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे.

रेल्वे मंडळाकडून मिळणाऱ्या सूचना आणि परवानगीनंतरच या उपक्रमाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाची मंजुरी मिळाल्यास यंदाच्या नाताळमध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रवासासोबतच सणाचा खास आनंदही अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.