Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी

Vande Bharat Sleeper Train: मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मेनूमध्ये नवा पदार्थ मिळणार आहे. पुरणपोळीची चव प्रवाशांना चाखता येणार आहे.
Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी
Vande Bharat Sleeper TrainSaam Tv
Published On: 

वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मराठमोळ्या जेवणाची मेजवाणी मिळणार आहे. आतापर्यंत तुम्ही वंदे भारत ट्रेनने प्रवास करताना इडली, मेदुवडा आणि चटणी खाल्ली असेल. पण आता तुम्हाला या ट्रेनने प्रवास करताना पुरणपोळीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करताना लवकरच प्रवाशांना पुरणपोळीची चव चाखता येणार असल्यामुळे प्रवाशांना आनंद झाला आहे.

या ट्रेनच्या खाद्यपदार्थांच्या यादीत महाराष्ट्राची पारंपारिक पदार्थ पुरणपोळी समाविष्ट करण्याचा विचार भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन मंहामंडळ म्हणजे आयआरसीटीसीकडून सुरू आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार करून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासात घरच्या चवीचा अनुभव घेता येणार आहे. कांद्या पोह्यासोबत पुरणपोळी प्रवाशांना खाता येईल.

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी
Vande Bharat Sleeper : 'वंदे भारत स्लीपर'मध्ये मिळणार नाही तात्काळ तिकीट; रेल्वेचे नवे नियम वाचून बसेल धक्का

मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना सध्या मेनूमध्ये इडली, उपमा, मेदुवडा आणि चटणीसारख्या दक्षिण भारतीय पदार्थांना प्राधान्य दिले गेले आहे. महाराष्ट्रातील पदार्थांमध्ये सध्या कांदा पोह्यांचा समावेश आहे. मराठी प्रवाशांना घरच्या चवीचा अनुभव देण्यासाठी पुरणपोळीचा समावेश करण्याचा प्रयत्न आयआरसीटीसीकडून सुरू आहे.

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी
गोव्यावरून धावणार नवीन Vande Bharat Express, प्रवासादरम्यान निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळणार; थांबे किती? वाचा वेळापत्रक

पुरणपोळीचे पॅकिंग, ताजेपणा, गरम ठेवणे आणि मोठ्या प्रमाणातील पुरवठ्याबाबत चाचपणी सुरू आयआरसीटीसीकडून सुरू आहे. पुरणपोळीसह अन्य मराठमोळ्या पदार्थांचाही विचार केला जात आहे. लवकरच सविस्तर प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. पुरणपोळीला महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष महत्व आहे. प्रत्येक सण-उत्सवामध्ये पुरळपोळी हा पदार्थ तयार केला जातो. फक्त महाराष्ट्रात नाही तर बाहेरच्या राज्यातील प्रवासी देखील पुरणपोळी खातात. त्यामुळे जर ट्रेन प्रवासात पुरणपोळी मिळाली तर प्रवाशांना इडली-वड्या व्यतिरिक्त नवीन पदार्थाचा आस्वद घेता येईल.

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी
Vande Bharat Train: पाहुण्यांना निरोप द्यायला गेले अन् ३६ हजारांचा दंड भरून आले! का बसला दंड? कुठे घडला हा प्रकार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.