Shreya Maskar
वीकेंडला रोजच्या धावपळीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवायचा असेल, तर मुंबई आणि पुण्याच्या आसपास अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत.
मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून जवळ असलेले लोणावळा हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आणि हिरव्यागार डोंगररांगांचा आनंद येथे घेता येतो.
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. येथील प्रदूषणमुक्त वातावरण, घनदाट झाडी, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि टॉय ट्रेनची सफर पर्यटकांना आकर्षित करते.
रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे विविध पक्ष्यांचे निरीक्षण करता येते, तसेच कर्नाळा किल्ल्याचा ट्रेकही करता येतो.
लोणावळ्याजवळ असलेला पवना तलाव पिकनिक आणि निसर्गभ्रमंतीसाठी प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठावरून दिसणारे डोंगर, सुंदर सूर्यास्त आणि शांत वातावरण यामुळे येथे विकेंडला पर्यटकांची गर्दी असते.
पुण्यापासून जवळ असलेले पानशेत धरण पिकनिकसाठी एक सुंदर ठिकाण आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्या आणि शांत परिसरामुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
पुणे आणि कोकणाला जोडणारा ताम्हिणी घाट निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे, धुक्याने वेढलेले रस्ते आणि सुंदर निसर्गदृश्ये यामुळे येथे वन डे पिकनिकचा आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.