Vande Bharat Sleeper : 'वंदे भारत स्लीपर'मध्ये मिळणार नाही तात्काळ तिकीट; रेल्वेचे नवे नियम वाचून बसेल धक्का

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या तिकीट आरक्षणाबाबत रेल्वेचे नवे नियम समोर आले आहेत. या ट्रेनमध्ये तात्काळ तिकीट सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. तसेच तिकीट दर, आरक्षण प्रक्रिया आणि एसी ३-टायर, एसी २-टायर व फर्स्ट एसीमधील आधुनिक सुविधांबाबत जाणून घ्या सविस्तर.
Vande Bharat Sleeper
Vande Bharat Sleepersaam tv
Published On: 

Vande Bharat Sleeper Tatkal Ticket Booking : लवकरच 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन्सची संध्या देशात वाढण्याची शक्यता आहे. रेल्वेकडून दूरच्या प्रवासासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनची निर्मिती केली. या हाय-स्पीड स्लीपर ट्रेनच्या तिकिटांच्या आरक्षणाबाबत आणि शुल्काबाबत रेल्वेकडून मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये इतर एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे तात्काळ तिकिटांची सुविधा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय तिकिटांच्या दराबाबतही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

आरक्षणाचे आणि तात्काळ तिकिटाचे नवीन नियम :

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना 'तत्काळ कोटा' (Tatkal Ticket) अंतर्गत तिकिटे बुक करता येणार नाहीत. या गाड्यांमधील सर्व बार्थचे आरक्षण हे केवळ नियमित आरक्षित श्रेणीतूनच (General Reservation) केले जाईल. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्काळ तिकिटाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना आधीच आपले नियोजन करावे लागणार आहे.

Vande Bharat Sleeper
MLA रेस्ट हाउसमध्ये खळबळ; काँग्रेस आमदाराच्या रूममध्ये तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले, राजकीय वर्तुळात खळबळ

फ्लेक्सी फेअर आणि डायनेमिक भाडेपद्धत:

या ट्रेनच्या भाड्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेसप्रमाणे वंदे भारत स्लीपरमध्ये सुरुवातीला फ्लेक्सी फेअर किंवा डायनेमिक भाडेपद्धत लागू असण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. मात्र, या ट्रेनच्या तिकिटांचे दर प्रवाशांच्या खिशाला परवडणारे ठेवण्याबाबत रेल्वे विचार करत असून, लक्झरी सुविधा आणि स्पीडनुसार याचे नियोजन केले जात आहे.

Vande Bharat Sleeper
मोठी बातमी! हार्दिक पांड्या आणि 'सरदार'ची अदलाबदल पक्की; एकाच झटक्यात बदलले समीकरण

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आरामाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात एसी ३-टायर, एसी २-टायर आणि फर्स्ट एसी (AC 1st Class) चे अत्याधुनिक कोच असतील. प्रवाशांना उत्तम झोपण्याची सोय, चार्जिंग पोर्ट, आधुनिक बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे आणि सुंदर अंतर्गत रचना (Interior) या ट्रेनमध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.