MLA रेस्ट हाउसमध्ये खळबळ; काँग्रेस आमदाराच्या रूममध्ये तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळले, राजकीय वर्तुळात खळबळ

MLA Rest House Controversy : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील आमदार विश्रामगृहात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नावावर असलेल्या खोलीत एक तरुण आणि तरुणी आढळल्याचा आरोप आहे.
Bhopal MLA Rest House Controversy
Bhopal MLA Rest House ControversyAI
Published On: 

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील आमदारांच्या विश्रामगृहात (MLA Rest House) सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिदपुरचे काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांच्या अधिकृत खोलीत त्यांच्या अनुपस्थितीत एक तरुण आणि तरुणी आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर संबंधित वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी विधानसभा सचिवालय आणि लोक निर्माण विभागाकडे (PWD) अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज तकने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदार दिनेश जैन बोस यांना विश्रामगृहातील ब्लॉक-३ मधील रूम नंबर १४ आणि १५ अलॉट करण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी आमदार दिल्लीवरून परतल्यानंतर दुपारी २ वाजता विश्रामगृहात पोहोचले. त्यांनी केअरटेकरकडे रूम नंबर १५ ची चावी मागितली, पण ती उपलब्ध नसल्याने त्यांना रूम नंबर १४ ची चावी देण्यात आली.

आमदार जेव्हा रूम नंबर १४ मध्ये गेले, तेव्हा त्यांना बाजूच्याच रूम नंबर १५ मधून काही संशयास्पद हालचाल जाणवली. त्यांनी पाहिलं असता, त्या खोलीमध्ये एक तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. आमदारांना अचानक समोर पाहताच ते दोघेही घाबरून तिथून पळून गेले.

Bhopal MLA Rest House Controversy
BREAKING: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; लाल्याला ३-४ जणांनी अडवलं अन् थेट..

आमदार आक्रमक, प्रशासनाकडे तक्रार दाखल:

आपल्या नावावर असलेल्या आणि कुलूपबंद असणाऱ्या शासकीय खोलीत परवानगीशिवाय बाहेरची व्यक्ती कशी पोहोचली, असा संतप्त सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना, परवानगी न देता केअरटेकरने रिसेप्शनवरून खोलीची चावी दुसऱ्या कोणालातरी कशी दिली, यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे.

Bhopal MLA Rest House Controversy
मोठी बातमी! हार्दिक पांड्या आणि 'सरदार'ची अदलाबदल पक्की; एकाच झटक्यात बदलले समीकरण

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार दिनेश जैन बोस यांनी विधानसभा सचिवालय आणि प्रमुख सचिवांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सध्या PWD या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून व्हीआयपी विश्रामगृहांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.