BREAKING: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; लाल्याला ३-४ जणांनी अडवलं अन् थेट..

Pune Crime News: पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला कोथरूडच्या सुतारदरा परिसरात खुनाची घटना घडली. जुन्या वादातून ३ ते ४ जणांनी प्रकाश येवले उर्फ लाल्या (२७) याच्यावर लोखंडी हत्यार आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असून कोथरूड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Pune Crime News 27-Year-Old Prakash Yewale Alias Lalya killed
Pune Crime News 27-Year-Old Prakash Yewale Alias Lalya killed
Published On: 

Pune Kothrud Murder Latest News : पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला एका हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर टोळक्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. प्रकाश येवले उर्फ 'लाल्या' (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रकाश येवले याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. काही दिवसांपूर्वीच येवल्याचा त्याच परिसरातील एका मंडळातील तरुणांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. याच जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Pune Crime News 27-Year-Old Prakash Yewale Alias Lalya killed
Maharashtra Weather: राज्यात गुलाबी थंडीची चाहूल; ऐन दिवाळीत पहाटेचा गारवा वाढला, पण दिवसा तापमानात वाढ, IMD चा अंदाज

शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रकाश येवले हा कोथरूडच्या सुतारदरा भागातून जात होता. त्यावेळी ३ ते ४ तरुणांनी त्याला अडवले आणि लोखंडी हत्यार तसेच लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात व पाठीवर सपासप वार केले. हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला.

Pune Crime News 27-Year-Old Prakash Yewale Alias Lalya killed
Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरूवात, तुमच्या खात्यात पैसे झाले का जमा?

हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या येवल्याला स्थानिकांच्या मदतीने तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून, त्यांना पकडण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.