Shreya Maskar
महाराष्ट्रीयन स्टाइल पुरणपोळी बनवण्यासाठी चणाडाळ, पाणी, साखर, वेलची पूड, जायफळ, गव्हाचे पीठ, मैदा, मीठ आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुवा. ती प्रेशर कुकरमध्ये घालून ३ ते ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. शिजल्यावर जास्तीचे पाणी काढून टाका आणि डाळ जाडसर वाटून घ्या.
वाटलेली डाळ पातेल्यात टाकून त्यात साखर मिक्स करा. गॅसची आच मंद ठेवा आणि दालचिनी-साखरेचे मिश्रण सतत ढवळत रहा.
मिश्रण घट्ट होऊ लागेल, तेव्हा त्यात वेलची पूड आणि किसलेले जायफळ घालून चांगले मिक्स करा. मिश्रण कोरडे आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. आता पुरणाचे मिश्रण थंड होऊ द्या.
पीठासाठी एका भांड्यात मैदा घ्या. त्यात मीठ आणि तूप घालून चांगले मिक्स करा. आता, थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पिठाचा गोळा ओल्या कापडाने किंवा प्लास्टिकच्या शीटने झाकून सुमारे ३० मिनिटे मुरू द्या.
पीठ तयार झाल्यावर त्याचे छोटे गोळे बनवा. एक गोळा हलक्या हाताने लाटून त्याच्या मध्यभागी तयार केलेले पुरणाचे सारण ठेवा. कडा बंद करून पुन्हा हलक्या हाताने गोल आकारात लाटा.
तवा गरम करून त्यावर तूप टाका आणि पुरणपोळी दोन्ही बाजूंनी खरपूस परतून घ्या. जेव्हा पुरणपोळी दोन्ही बाजूंनी हलकी सोनेरी होईल, तेव्हा ती तव्यावरून काढा.
गरम पुरणपोळीवर थोडे तूप घालून सर्व्ह करा. पुरणपोळीचा दूध किंवा आमटीसोबत आस्वाद घ्या. तसेच गणपतीला नैवेद्य दाखवा.