Patolya Recipe : कोकणचा पारंपरिक गोडवा जपा, गणपतीला नैवेद्यासाठी बनवा हळदीच्या पानातील पातोळ्या!

Shreya Maskar

कोकणी गोड पदार्थ

हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्यासाठी तूप, ओलं खोबर, गूळ, हळदीची पाने, तांदळाचे पीठ, पाणी, मीठ आणि वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Konkani Sweet Delicacy | pinterest

हळदीच्या पानातील पातोळ्या

हळदीच्या पानातील पातोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात गूळ घालून तो वितळवून घ्या. लक्षात ठेवा हे करताना गॅस कमी आचेवर ठेवा.

Patolya in Turmeric Leaves | pinterest

गूळ

गूळ संपूर्ण विरघळल्यानंतर त्यात किसलेलं खोबर आणि चिमूटभर वेलची पूड घाला. याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळेल. खोबर आणि गुळाचे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. त्याचे सारण बनवा. गोडाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार असावे.

Jaggery | pinterest

तांदळाचे पीठ

सारण थंड झाल्यावर एका वेगळ्या डिशमध्ये काढून घ्या. आता कणिक बनवायला घ्या. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी आणि तांदळाचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून उकड काढून घ्यावी.

Rice Flour | pinterest

हळदीची पाने

उकड तयार झाल्यावर ती एका ताटात काढून तेलाच्या मदतीने चांगली मऊ मळून घ्यावी. दुसरीकडे हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्या.

Turmeric Leaves | pinterest

तेल

शेवटी हळदीच्या पानांना तेल लावून त्यावर छोटे छोटे तांदळाच्या पीठाचे गोळे थापून घ्या. गोळे जास्त पातळ किंवा जाड होणार नाही याची काळजी घ्या.

Oil | pinterest

खोबऱ्याचे सारण

त्यानंतर यात खोबऱ्याचे सारण भरून हळदीचे पान दुमडून घ्या. सर्व बाजूंनी पातोळी व्यवस्थित बंद झाली का ते तपासून घ्या.

Coconut | pinterest

पातोळ्या वाफवा

कुकरवर चाळण ठेवून पातोळ्या १५ ते २० मिनिटे वाफवून घ्याव्यात. अशाप्रकारे खमंग कोकण स्पेशल हळदीच्या पानातील पातोळ्या तयार झाल्या.

Steaming the Patolis | pinterest

NEXT : वेळ कमी आहे? गॅसची गरजही नाही, फक्त ५ पदार्थांनी बनवा झटपट कळीदार मोदक

Instant Modak Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...