Vande Bharat Train: पाहुण्यांना निरोप द्यायला गेले अन् ३६ हजारांचा दंड भरून आले! का बसला दंड? कुठे घडला हा प्रकार?

Vande Bharat Train: कानपूरमध्ये पाहुण्यांना निरोप देण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये चढणं एका कुटुंबाला महागात पडलं. विनातिकीट ट्रेनमध्ये चढलेल्या १२ जणांना तब्बल ३६ हजारांचा दंड ठोठावल्याची माहिती आहे. नेमकं काय घडलं?
Vande Bharat Train: Kanpur Family Fined Rs 36,000 For Boarding Without Tickets
Vande Bharat Train: Kanpur Family Fined Rs 36,000 For Boarding Without Ticketssaam tv
Published On: 
Summary
  • उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये वंदे भारत ट्रेनशी संबंधित घटना घडल्याची माहिती आहे.

  • पाहुण्यांना निरोप देण्यासाठी एका कुटुंबातील सदस्य रेल्वे स्थानकावर गेले होते.

  • साधी रेल्वे समजून कुटुंबातील १२ जण वंदे भारत ट्रेनमध्ये चढले.

भारतीय रेल्वे स्टेशनवर नियम न पाळणे एका कुटंबाला चांगलेच महागात पडले. तिकीट न घेता प्रवास करत असाल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. इतकेच नाही तर रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट नसले तरी दंड भरावा लागतो. आरामदायी आणि वेगवान प्रवासासाठी भारतीय रेल्वेकडून सध्या देशभरात अत्याधुनिक 'वंदे भारत एक्स्प्रेस' चालवल्या जात आहेत. मात्र, या हायटेक ट्रेनच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील एका कुटुंबालाही रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणं चांगलेच महागात पडलंय.

घरी आलेल्या पाहुण्यांना कुटुंबातील १२ जणांना रेल्वे विभागाने दंड ठोठवलाय. साधी रेल्वे समजून हे नातेवाईक वंदे भारत ट्रेनमध्ये चढले. पण ही ऑटोमॅटिक ट्रेन होती, त्यामुळे ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद झाले. त्यामुळे पाहुण्यांना निरोप देण्यासाठी आलेले कुटुंबीय ट्रेनमध्ये अडकले.

Vande Bharat Train: Kanpur Family Fined Rs 36,000 For Boarding Without Tickets
Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

दरवाज बंद होताच ट्रेन सुरू झाली

दरवाजे बंद झाल्यानंतर हे सर्वजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करून लागले. परंतु ट्रेन ऑटोमॅटिक असल्यानं दरवाजे बंद होताच ट्रेनने वेग पकडला. यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. ज्या पाहूण्यांना सोडायला आले होते त्‍यांच्याबरोबरच यांना तब्बल १३९ किलोमीटर पर्यंत प्रवास करावा लागला. त्यांना अखेर इटावा जंक्शनवर या हायटेक ट्रेनचा विना-नियोजित थांबा घेऊन या सर्वांना खाली उतरवण्यात आले. मात्र त्यांच्याकडे रेल्वे विभागाने तब्बल ३६,००० रुपयांचा दंड वसूल केला.

रविवारी सकाळी वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २२४१५) कानपूर स्थानकावर उभी होती. यावेळी आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना डब्यात बसवून देण्यासाठी १२ जण ट्रेनमध्ये चढले. मात्र सकाळी ९:३० वाजता ट्रेन सुटण्याची वेळ होताच ट्रेनचे ऑटोमॅटिक दरवाजे बंद झाले आणि हे सर्वजण आत अडकले. त्यांनी ट्रेनमधील कर्मचाऱ्यांकडे गाडी थांबवण्याची विनंती केली, परंतु ही हायटेक ट्रेन तातडीने थांबवता येत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

Vande Bharat Train: Kanpur Family Fined Rs 36,000 For Boarding Without Tickets
दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात मोठी वाढ; वाहनचालकांचे बजेट कोलमडलं!

डब्यात प्रवाशांचा गोंधळ वाढत असल्याचे पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी टूंडला कंट्रोल रूमला याची माहिती दिली. अखेर कानपूरमधून निघाल्यानंतर तब्बल ७९ मिनिटांच्या प्रवासानंतर इटावा जंक्शनवर विना-नियोजित थांबा घेऊन ही ट्रेन थांबवण्यात आली. मात्र ट्रेनमध्ये अडकलेल्यांकडून वसूल करण्यात आला.

कानपूर सेंट्रल ते इटावा जंक्शन हे अंतर सुमारे १३९ किलोमीटर आहे. इटावा स्थानकावर ट्रेन थांबताच या १२ जणांना खाली उतरवण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीत नेण्यात आले. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, या कोणाकडेही प्रवासाचे वैध तिकीट किंवा साधे प्लॅटफॉर्म तिकीटही नसल्याचे समोर आले. त्यामुळे नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीकडून ३,००० रुपये याप्रमाणे १२ जणांकडून एकूण ३६,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.