दिवाळीनंतर महागाईचा आणखी एक झटका! सीएनजीच्या दरात मोठी वाढ; वाहनचालकांचे बजेट कोलमडलं!

CNG Price Hike : दिवाळीनंतर नंदुरबारमध्ये सीएनजीच्या दरात किलोमागे ३ रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजीचा दर १०८ रुपयांवर पोहोचला. महाराष्ट्र आणि गुजरातमधील दरातील १२ रुपयांचा फरक जाणून घ्या.
Nandurbar CNG Price Increased
Nandurbar CNG Price Increased
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र आणि गुजरातमधील सीएनजी दरात १२ रुपयांचा फरक

  • अवघ्या २० दिवसांत सीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ

  • सीएनजी महागल्याने वाहनचालकांच्या बजेटवर काय परिणाम?

सागर निकवाडे,साम प्रतिनिधी

दिवाळीनंतर नागरिकांना महामाईचा मार सहन करावा लागत आहे. इंधन, वीज आणि बिगर-खाद्य वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाईचा दर वाढून १२.२९ टक्क्यांवर पोहोचलाय. नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा सीएनजी दरात ३ रुपयांची वाढ करण्यात आलीय. या दरवाढीमुळे सीएनजी १०८ रुपयांवर पोहोचलाय.

याआधी २० दिवसाआधीच सीएनजीचे दर वाढवण्यात आले होते. दिवाळीनंतर सीएनजीच्या दरात आणखी वाढ झाल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना महागाईचा आणखी एक फटका बसलाय. अवघ्या २० दिवसांत सीएनजीच्या दरात किलोमागे ३ रुपयांची वाढ झालीय. त्यामुळे १०५ रुपये किलो असलेला सीएनजी आता १०८ रुपयांवर पोहोचलाय. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणित बिघडलंय.

विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमधील सीएनजीच्या दरात तब्बल १२ रुपयांची तफावत असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात सीएनजीचा दर १०८ रुपये किलो असताना गुजरातमध्ये हाच दर ९६ रुपये किलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेय.

सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनचालक हैराण झालेत. अशीच दरवाढ सुरू राहिली, तर सीएनजीपेक्षा पेट्रोल परवडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया काही वाहनचालकांकडून व्यक्त केली जातेय. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात सीएनजी महाग का, असा सवालही वाहनधारक उपस्थित करत आहेत. गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सीएनजीचे दर कमी करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागलीय.

मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ

महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ केलीय. आखाती देशांतील युद्धाचं वातावरण आणि महागड्या गॅस आयातीमुळे दरवाढ करण्यात आलीय. सीएनजी आता ८८ रुपये प्रतिकिलो असा मिळतोय.

ऑटो-टॅक्सीची भाडेवाढ कुठे?

वाढत्या इंधनाच्या दरामुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढ करण्यात आलीय. रिक्षाचं किमान भाडं १ रुपयानं तर टॅक्सीचे भाडं २ रुपयांनी वाढलंय. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च यामुळे ही दरवाढ करण्यात आलीय. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई-विरार, पालघरमध्ये भाडेवाढ करण्यात आलीय. पुण्यात रिक्षाची मीटर दरवाढ लागू झाली आहे. पुण्यात आता एक किलो सीएनजीसाठी ९७ रुपये ७५ पैसे मोजावे लागत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.