Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

train coach colors meaning : रेल्वे डब्यांच्या रंगांवरून त्यांचा प्रकार चटकन ओळखता येतो, कारण प्रत्येक रंगामागे प्रवाशांसाठी एक खास वर्ग किंवा उद्देश असतो. तर, पाहूया कोणत्या रंगाचा डबा कोणत्या प्रकारचा असतो
WHAT DO RED, BLUE, AND YELLOW TRAIN COACHES MEAN?
WHAT DO RED, BLUE, AND YELLOW TRAIN COACHES MEAN?saam tv
Published On: 

भारतीय रेल्वेने प्रवास करताना आपण अनेक रंगांचे डबे पाहिले असतील. प्रामुख्याने निळे, लाल आणि पिवळे किंवा हिरवे डबे रेल्वेगाड्यांमध्ये वापरले जातात. डब्यांचा हा रंग केवळ सौंदर्यासाठी नसून, तो त्या डब्याचा प्रकार, वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेची माहिती दर्शवतो. रेल्वेने डब्यांच्या रंगांवरून प्रवाशांना त्यांची वर्गवारी सहज समजावी यासाठी खास रंगसंगती ठरवून दिली आहे. पूर्वी सर्व डबे गडद लाल रंगाचे असत, पण काळानुसार प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डब्यांच्या रंगांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत

लाल रंगाचे ‘एलएचबी’ डबे हाय-स्पीड गाड्यांसाठी वापरले जातात, जे अधिक सुरक्षित मानले जातात. निळ्या रंगाचे ‘आयसीएफ’ डबे पारंपरिक एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये दिसतात. तसेच, हिरवा रंग, तर उपनगरीय लोकल आणि विशेष गाड्यांसाठी करड्या किंवा पांढऱ्या रंगाची निवड केली जाते. ट्रेनचा हा रंगप्रकार प्रवाशांना गाडीचा प्रकार समजण्यास मदत करतो. जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती

WHAT DO RED, BLUE, AND YELLOW TRAIN COACHES MEAN?
Indian Railways : ट्रेनला उशिरा आहे, प्लॅटफॉर्मवर बसून झोप येतेय? महागड्या हॉटेलवर जाण्यापेक्षा रेल्वेची ही सुविधा येईल तुमच्या कामी

निळा डबा

हे पारंपरिक आयसीएफ (ICF) डबे असतात. प्रामुख्याने सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यांचा वापर केला जातो. बहुतांश मेल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये हे डबे पाहायला मिळतात. यामध्ये एसी कोच प्रामुख्याने असतात. जसे की, AC1, AC2, AC3

लाल डबा

हे आधुनिक व अत्यंत सुरक्षित एलएचबी (LHB) डबे असतात. प्रामुख्याने राजधानी, शताब्दी किंवा प्रीमियम सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांमध्ये यांचा वापर केला जातो. यामध्ये उत्कृष्ट वातानुकूलित AC व्यवस्था आणि अत्यंत आरामदायी सोयी-सुविधा असतात.

पिवळा डबा

पिवळ्या रंगाचे डबे किंवा डब्यावर असणाऱ्या पिवळ्या पट्ट्या या प्रामुख्याने जनरल म्हणजेच अनरक्षित डब्यांची ओळख पटवून देतात. सर्वसामान्य प्रवासी चालू तिकीट काढून यातून प्रवास करतात.

WHAT DO RED, BLUE, AND YELLOW TRAIN COACHES MEAN?
Cleaning Hacks : घरातील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंध येतोय का? हे ५ सोपे उपाय नक्की करुन बघा

हिरवा डबा

गर्दीच्या मार्गांवर धावणाऱ्या किंवा किफायतशीर एसी ट्रेन्समध्ये उदा. गरीब रथ एक्सप्रेस हिरव्या रंगाच्या डब्यांचा वापर केला जातो. हे डबे कमी खर्चात बजेट-फ्रेंडली एसी प्रवासाचे संकेत देतात.

राखाडी डबा

हे डबे सहसा ट्रेनच्या अगदी शेवटी किंवा सुरुवातीला असतात. यांना 'सामान आणि जनरेटर कार' (SLR) म्हणतात. यांचा वापर रेल्वेचे पार्सल, सामान वाहून नेण्यासाठी आणि ट्रेनला वीज पुरवठा करण्यासाठी होतो.

नारंगी डबा

तेजस एक्सप्रेस, वंदे भारत किंवा आधुनिक हाय-स्पीड ट्रेन्समध्ये नारंगी रंगाचा वापर प्रामुख्याने दिसतो. हा रंग अतिवेगवान, आधुनिक सुविधा आणि प्रीमियम प्रवासाचे प्रतीक मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.