Indian Railways : ट्रेनला उशिरा आहे, प्लॅटफॉर्मवर बसून झोप येतेय? महागड्या हॉटेलवर जाण्यापेक्षा रेल्वेची ही सुविधा येईल तुमच्या कामी

train delay stay options : प्रवासात प्लॅटफॉर्मवर ताटकळत बसण्याची आता गरज नाही, कारण भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी घेऊन आले आहेत या सुविधा ज्यामुळे तुमचा प्रवास होईल पूर्णपणे आरामदायी
 STAY AT RAILWAY RETIRING ROOMS INSTEAD OF EXPENSIVE HOTELS
STAY AT RAILWAY RETIRING ROOMS INSTEAD OF EXPENSIVE HOTELSSAAM TV
Published On: 

रेल्वे प्रवास करताना ट्रेनला उशीर असल्यास किंवा कनेक्टिंग ट्रेनची वाट बघत असताना प्लॅटफॉर्मवर ताटकळत बसण्याची गरज नाही. प्रवाशांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे आणि आयआरसीटीसी (IRCTC) कडून अत्यंत किफायतशीर आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्या

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात अनेकदा गाड्या उशिराने धावतात किंवा एका रेल्वेतून उतरून दुसरी कनेक्टिंग ट्रेन पकडण्यासाठी स्थानकावर अनेक तास वाट बघावी लागते. अशा वेळी प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर किंवा गर्दीत बसून वेळ काढणे प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरते. या समस्येवर मात करण्यासाठी रेल्वे प्रवाशांना प्रामुख्याने दोन उत्तम पर्याय देते ते म्हणजे 'वेटिंग रूम' आणि 'रिटायरिंग रूम' . बऱ्याचदा प्रवाशांना या दोन्हीमधील फरक माहीत नसतो, त्यामुळे ते योग्य सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि तात्काळच स्टेशनवर बसून राहतात.

 STAY AT RAILWAY RETIRING ROOMS INSTEAD OF EXPENSIVE HOTELS
Cleaning Hacks : घरातील कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंध येतोय का? हे ५ सोपे उपाय नक्की करुन बघा

मोफत वेटिंग रूम

वेटिंग रूम हा ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर असलेला एक मोठा सार्वजनिक हॉल असतो. या सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवाशांना यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. स्टेशनवरील सामान्य किंवा एसी वेटिंग रूम वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ वैध रेल्वे तिकीट असणे अनिवार्य आहे. एंट्री गेटवर तिकीट दाखवून तुम्ही आरामात येथे बसू शकता आणि ट्रेन येण्याची वाट पाहू शकता. जर ट्रेनला काही तासांचाच उशीर असेल, तर हा पर्याय अत्यंत सोयीचा ठरतो.

हॉटेलसारखी सुविधा देणारे रिटायरिंग रूम

रिटायरिंग रूमचे स्वरूप वेटिंग रूमपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. हे एखाद्या चांगल्या हॉटेलच्या रूमसारखे असते, जिथे प्रवाशांना पूर्ण प्रायव्हसी, आरामदायी बेड आणि आंघोळीसाठी अटॅच बाथरुमसारख्या सुविधा मिळतात. लांबच्या प्रवासामुळे जास्त थकवा जाणवत असल्यास, अंघोळ करायची असल्यास किंवा शांत झोप घ्यायची असल्यास हा उत्तम पर्याय आहे.

 STAY AT RAILWAY RETIRING ROOMS INSTEAD OF EXPENSIVE HOTELS
Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

मात्र, यासाठी केवळ रेल्वे तिकीट असणे पुरेसे नाही, तर याचे अतिरिक्त शुल्क भरावे लागते. हे कक्ष काही तासांसाठी किंवा पूर्ण दिवसासाठी बुक करता येतात. याची बुकिंग रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून किंवा IRCTC च्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन पद्धतीने सहज करता येते.

जर ट्रेन येण्यात किंवा कनेक्टिंग ट्रेन मिळण्यात अवघे काही तास बाकी असतील, तर पैसे खर्च न करता मोफत वेटिंग रूमचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. परंतु, प्रवासात अतिशय थकवा जाणवत असल्यास आणि शांततेत विश्रांती घ्यायची असल्यास, वाजवी दरात आयआरसीटीसीचे रिटायरिंग रूम बुक करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.