Kitchen Cleaning : स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी टिप्स, जाणून घ्या

Saam Tv

ओटा रिकामा ठेवा

ओट्यावर अनावश्यक भांडी,वस्तू किंवा मिक्सर सतत पसरवून ठेवू नका. जास्तीत जास्त वस्तू कपाटात ठेवा, जेणेकरून जेवण बनवताना मोकळी जागा मिळेल.

Kitchen Cleaning | pinterest

सिंकचे पाणी लगेच काढून टाका

भांडी धुतल्यानंतर किंवा काम झाल्यावर सिंकमधील साचलेले पाणी आणि अन्नाचे कण लगेच स्वच्छ करा, जेणेकरून चिकटपणा राहणार नाही.

Kitchen Cleaning | pinterest

सांडलेले पदार्थ तात्काळ पुसा

ओट्यावर काही सांडल्यास ते सुकण्याची वाट न बघता लगेच ओल्या कपड्याने पुसून टाका. वाळल्यानंतर ते काढणे अधिक कठीण होते.

Kitchen Cleaning | pinterest

काम करत असतानाच आवरत जा

एखादे भांडे किंवा साहित्य वापरून झाल्यावर ते पुन्हा जागेवर ठेवा,जेणेकरून शेवटी ओट्यावर ढीग साचणार नाही.

Kitchen Cleaning | pinterest

कचऱ्यासाठी वेगळे भांडे ठेवा

भाजी चिरताना किंवा फळे सोलताना साली थेट एका छोट्या बाऊलमध्ये किंवा कचऱ्याच्या भांड्यात टाका, जेणेकरून ओटा खराब होणार नाही.

Kitchen Cleaning | pinterest

प्रत्येक वस्तूला योग्य जागा द्या

घरातील साहित्यासाठी एक निश्चित जागा ठरवा, जेणेकरून ती वस्तू शोधण्यात वेळ जाणार नाही आणि स्वयंपाकघरात पसारा होणार नाही.

Kitchen Cleaning | pinterest

नियमित साफसफाईचे दिवस ठरवा

ओटा, गॅस शेगडी किंवा लादी साफ करण्यासाठी आठवड्यातील ठराविक दिवस निश्चित करा, ज्यामुळे कोणतीही गोष्ट विसरली जाणार नाही.

Kitchen Cleaning | pinterest

नित्यक्रम आखा

सकाळी नाष्ट्यानंतर डिशवॉशर किंवा भांडी रिकामी करणे आणि रात्री जेवण झाल्यानंतर लगेच भांडी घासून झोपणे अशी सवय ठेवा, म्हणजे सकाळी उठताच स्वच्छ स्वयंपाकघर पाहायला मिळेल.

Kitchen Cleaning | pinterest

NEXT : घरापासून ऑफिसपर्यंत दिवसभर एसीमध्ये राहताय? आरोग्यावर होणारे ७ घातक परिणाम, जाणून घ्या

Air conditioning health risks | saam tv
येथे क्लिक करा