Indian Railways : आरामदायी बेड, ऑटोमॉटिक डोअर..; वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट एसी डबा पारंपरिक फर्स्ट एसीपेक्षा किती वेगळा?

Inside Vande Bharat Sleeper’s First AC Coach : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट एसी डबा पारंपरिक फर्स्ट एसी डब्यांपेक्षा अनेक पटीने आधुनिक आणि आरामदायी आहे. यामध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
How is Vande Bharat Sleeper First AC coach different from traditional First AC
How is Vande Bharat Sleeper First AC coach different from traditional First ACsaam tv
Published On: 

वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला आधुनिक स्वरूप मिळाले आहे. या ट्रेनमधील फर्स्ट एसी डब्यात आकर्षक सजावट, आरामदायी बर्थ, स्वयंचलित दरवाजे आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. मग पारंपरिक फर्स्ट एसी आणि वंदे भारत स्लीपरच्या फर्स्ट एसीमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घेऊया.

भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनमुळे रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला आधुनिक सुविधांची जोड मिळाली आहे. राजधानी आणि दुरंतो यांसारख्या गाड्यांमधील पारंपरिक फर्स्ट एसी डब्यांच्या तुलनेत वंदे भारत स्लीपरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

How is Vande Bharat Sleeper First AC coach different from traditional First AC
Kitchen Tips : भाज्या आधी धुवाव्यात की कापल्यानंतर? संशोधनातून समोर आली योग्य पद्धत

डब्याच्या रचनेत बदल

पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये स्वतंत्र केबिन आणि कूपेची व्यवस्था असते. मात्र, वंदे भारत स्लीपरच्या फर्स्ट एसीमध्ये आधुनिक अंतर्गत सजावट, आकर्षक एलईडी प्रकाशयोजना आणि डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे डब्याला अधिक आधुनिक स्वरूप मिळाले आहे.

बर्थ अधिक आरामदायी

रात्रीच्या प्रवासात चांगली झोप मिळणे महत्त्वाचे असते. वंदे भारत स्लीपरमध्ये शरीराला योग्य आधार मिळेल अशा पद्धतीने बर्थ तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुधारित कुशनिंगचा वापर केला आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्येही आरामदायी बर्थ असतात; मात्र वंदे भारतमध्ये त्यांची रचना अधिक आधुनिक आहे.

स्वयंचलित दरवाजांची सुविधा

पारंपरिक रेल्वे डब्यांचे दरवाजे हाताने उघडावे आणि बंद करावे लागतात. वंदे भारत स्लीपरमध्ये मात्र स्वयंचलित सरकते दरवाजे बसवण्यात आले आहेत. दोन डब्यांमधील जोडमार्गही अधिक रुंद आणि बंदिस्त ठेवण्यात आले आहेत.

How is Vande Bharat Sleeper First AC coach different from traditional First AC
Winter Health : हिवाळ्यात गूळ खाताय? मग सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

मोबाईल चार्जिंगसाठी आधुनिक सुविधा

वंदे भारत स्लीपरमध्ये तीन पिनचे चार्जिंग सॉकेट, यूएसबी टाइप-ए आणि टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक बर्थसाठी स्वतंत्र वाचन दिव्यांची व्यवस्था आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये चार्जिंग सॉकेट आणि वाचन दिवे असले तरी यूएसबी पोर्टची सुविधा सर्व डब्यांमध्ये उपलब्ध नसते.

सुरक्षेला प्राधान्य

वंदे भारत स्लीपरमध्ये 'कवच' सुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, आग शोधणारी यंत्रणा, अग्निरोधक दरवाजे आणि आपत्कालीन टॉक-बॅक सुविधा देण्यात आली आहे. वातानुकूलन यंत्रणेत यूव्ही-सी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे. पारंपरिक फर्स्ट एसीमध्ये या सर्व सुविधा एकाच स्वरूपात उपलब्ध असतीलच असे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.