Travel Tips :वंदे भारतमध्ये चुकून अडकलात? घाबरू नका, दंड टाळण्यासाठी जाणून घ्या हे ३ नियम

Vande Bharat Wrong Boarding Rules : रेल्वे स्टेशनवर नातेवाइकांना सोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गेलात आणि अचानक दरवाजे बंद झाले तर काय कराल? ट्रेनमध्ये अडकल्यास घाबरून चुकीचे पाऊल उचलण्यापेक्षा या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
indian railways rules for passengers boarding wrong train accidentally
indian railways rules for passengers boarding wrong train accidentallysaam tv
Published On: 

देशातील आधुनिक आणि वेगवान रेल्वे गाड्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश होतो. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले आहेत. मात्र, याच दरवाजांमुळे काही वेळा प्रवाशांसाठी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखाद्या प्रवाशाला नातेवाइकांना ट्रेनमध्ये सोडण्यासाठी डब्यात जाताना बाहेर पडण्यास उशीर झाला आणि दरवाजे बंद झाले, तर तो आत अडकू शकतो. अशा परिस्थितीत घाबरून जाण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

अलीकडेच अशाच प्रकारची घटना समोर आली. काही व्यक्ती आपल्या कुटुंबीयांना ट्रेनमध्ये बसवण्यासाठी डब्यात गेल्या होत्या. मात्र, त्यांना बाहेर पडण्यापूर्वीच ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाले. त्यामुळे त्या आतच अडकल्या. या प्रकारामुळे त्यांना दंडालाही सामोरे जावे लागले. अशा प्रसंगी काय करावे, याबाबत जाणून घेऊया

indian railways rules for passengers boarding wrong train accidentally
Health Tips : जेवणानंतर कामात लक्ष लागत नाही? सतत झोप येण्यामागे असू शकतात ही ५ कारणे

ट्रेन प्लॅटफॉर्मवरच असेल तर टॉक-बॅक बटण दाबा

तुम्ही ट्रेनमध्ये अडकला आहात आणि ट्रेन अद्याप प्लॅटफॉर्मवर उभी आहे, अशा वेळी डब्याच्या दरवाजाजवळ असलेल्या 'इमर्जन्सी टॉक-बॅक' बटणाचा वापर करा. हे बटण दाबल्यानंतर तुमचा आवाज गार्ड किंवा लोको पायलटपर्यंत पोहोचू शकतो. त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगा. त्यानंतर अधिकृत कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

ट्रेन सुरू झाली असेल तर टीटीईला माहिती द्या

तुम्ही बाहेर पडण्यापूर्वीच ट्रेनने स्टेशन सोडले असेल, तर अजिबात घाबरू नका. डब्यात लपण्याचा किंवा पळापळ करण्याचा प्रयत्न करू नका. तातडीने टीटीई किंवा कोच अटेंडंटशी संपर्क साधा. आपण नातेवाइकांना सोडण्यासाठी ट्रेनमध्ये आलो होतो आणि चुकून आत अडकलो, हे प्रामाणिकपणे सांगा. पुढील स्टेशनवर उतरण्यासाठी त्यांची मदत घ्या.

दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करू नका

अनेकदा घाबरलेल्या अवस्थेत प्रवासी दरवाजे हाताने ओढून किंवा जोर लावून उघडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते. दरवाजांचे नुकसान केल्यास सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.

indian railways rules for passengers boarding wrong train accidentally
Helth Tips : रोज अॅसिडिटीचा त्रास होतोय? गोळी घेतल्याने आराम मिळतो, पण पोटात पुन्हा-पुन्हा जळजळ का होते?

मोठ्या दंडापासून कसे वाचाल?

रेल्वेच्या नियमांनुसार वैध तिकीट नसताना पुढील स्टेशनपर्यंत प्रवास केल्यास विनातिकीट प्रवासाचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे ट्रेनमध्ये चुकून अडकल्यास तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देणे आणि शक्य असल्यास त्याच स्टेशनवर उतरण्यासाठी मदत मागणे महत्त्वाचे आहे. तसेच रेल्वेच्या टोल फ्री नं 139 ला कॉल करा.

त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये नातेवाइकांना सोडण्यासाठी जाताना वेळेचे भान ठेवा. दरवाजे बंद होण्यापूर्वी डब्याबाहेर पडा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.