Health Tips : जेवणानंतर कामात लक्ष लागत नाही? सतत झोप येण्यामागे असू शकतात ही ५ कारणे

fatigue after eating : जेवल्यानंतर पोट भरल्याने शरीरातील रक्तप्रवाह पचनाकडे वळतो, ज्यामुळे मेंदूला मिळणारा ऑक्सिजन तात्पुरता कमी होतो आणि आळस किंवा झोप येऊ लागते.
top 5 reasons why you feel sleepy and lose focus after eating meals
top 5 reasons why you feel sleepy and lose focus after eating mealssaam tv
Published On: 

दुपारचे जेवण झाल्यानंतर डोळ्यांवर झोप येणे, शरीर जड वाटणे आणि कामात लक्ष न लागणे, असा अनुभव अनेकांना येतो. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना जेवणानंतर आळस आणि थकवा जाणवतो. मात्र, यामागे केवळ पोट भरून जेवणे हेच कारण नसते. शरीरातील नैसर्गिक बदलांपासून ते चुकीच्या आहाराच्या सवयींपर्यंत अनेक गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

दुपारच्या जेवणानंतर झोप येण्याच्या या स्थितीला वैद्यकीय भाषेत 'पोस्टप्रॅन्डियल सोम्नोलन्स'असे म्हणतात. ही एक सामान्य प्रक्रिया असली तरी काही लोकांमध्ये तिचा परिणाम अधिक जाणवतो.

top 5 reasons why you feel sleepy and lose focus after eating meals
Home Vastu Tips : घरात गिझर कोणत्या दिशेला बसवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

जेवणानंतर झोप येण्यामागची ५ कारणे

शरीराचे नैसर्गिक जैविक घड्याळ

आपल्या शरीरात झोप आणि जागेपणाचे एक नैसर्गिक चक्र असते. दुपारच्या सुमारास शरीराची सतर्कता काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे जेवणानंतर झोप अधिक जाणवू शकते.

गरजेपेक्षा जास्त जेवण

दुपारी भरपूर जेवण केल्यामुळे पोट जड होऊ शकते. विशेषतः जास्त तेलकट, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यास सुस्ती जाणवण्याची शक्यता वाढते.

अपुरी झोप

रात्री पुरेशी झोप न झाल्यास दिवसभर थकवा जाणवतो. अशावेळी दुपारच्या वेळी येणारी नैसर्गिक सुस्ती अधिक तीव्र होऊ शकते.

चुकीच्या आहाराच्या सवयी

जेवणात पांढरा भात, मैदा आणि गोड पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यास रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतात. याचाही थकव्यावर परिणाम होऊ शकतो.

top 5 reasons why you feel sleepy and lose focus after eating meals
Helth Tips : रोज अॅसिडिटीचा त्रास होतोय? गोळी घेतल्याने आराम मिळतो, पण पोटात पुन्हा-पुन्हा जळजळ का होते?

शरीरात पाण्याची कमतरता

दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरात निर्जलीकरण होऊ शकते. त्यामुळे थकवा, सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.

जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून काय करावे?

  • दुपारचे जेवण प्रमाणात आणि संतुलित घ्यावे.

  • आहारात डाळी, भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करावा.

  • दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.

  • जेवणानंतर १० ते १५ मिनिटे हलके चालावे.

  • रात्री किमान ७ ते ९ तासांची शांत झोप घ्यावी.

जेवणानंतर थोडी सुस्ती येणे सामान्य आहे. मात्र, पुरेशी झोप घेऊनही दिवसभर प्रचंड झोप येत असेल किंवा चक्कर, अशक्तपणा आणि अतिथकवा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेह, थायरॉईड किंवा झोपेशी संबंधित समस्याही यामागे असू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.