Helth Tips : रोज अॅसिडिटीचा त्रास होतोय? गोळी घेतल्याने आराम मिळतो, पण पोटात पुन्हा-पुन्हा जळजळ का होते?

acidity causes : अनेकांना वारंवार अॅसिडिटीचा त्रास होतो. अशावेळा आपण गोळी घेतो त्यानंतर तात्पुरता आराम मिळतो, पण पोटातील जळजळ पुन्हा होते. असे होण्यामागे नेमके कारण काय जाणून घ्या.
How to improve digestion and prevent daily acidity naturally
How to improve digestion and prevent daily acidity naturally saam tv
Published On: 

छातीत जळजळ, आंबट ढेकर, जेवणानंतर पोटात आग होणे किंवा घशापर्यंत आंबट पाणी येणे असे त्रास तुम्हालाही वारंवार होत आहेत का? अॅसिडिटीची गोळी घेतल्यानंतर काही काळ आराम मिळतो. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा तोच त्रास सुरू होतो. अशावेळी केवळ गोळीवर अवलंबून न राहता आपल्या आहाराच्या आणि जीवनशैलीच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आजकाल बदललेली जीवनशैली, अनियमित जेवणाच्या वेळा आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे अॅसिडिटीचा त्रास अनेकांना जाणवतो. विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे, बराच वेळ उपाशी राहणे, रात्री उशिरा जेवणे आणि वारंवार तिखट-तेलकट पदार्थ खाणे यामुळे काही लोकांमध्ये अॅसिडिटीची लक्षणे वाढू शकतात.

How to improve digestion and prevent daily acidity naturally
Vastu Tips : पर्समध्ये या ३ गोष्टी ठेवताय? सावधान! आर्थिक संकटाला मिळू शकतं निमंत्रण

आयुर्वेदानुसार अॅसिडिटीचा संबंध पित्तदोषाशी जोडला जातो. मात्र, वैद्यकीयदृष्ट्या पोटातील आम्लाचे प्रमाण, अन्ननलिकेत आम्ल परत येणे आणि पचनसंस्थेशी संबंधित इतर कारणांमुळेही हा त्रास होऊ शकतो.

अॅसिडिटी कमी करण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये करा हे बदल

  • दिवसभर खूप वेळ उपाशी राहणे टाळा. ठरावीक वेळेत जेवण्याची सवय लावा. गरजेनुसार हलका पौष्टिक नाश्ता करा.

  • रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर ठेवा. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा.

  • दिवसातून वारंवार चहा पिण्याची सवय असल्यास ती कमी करा. विशेषतः रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा.

  • जास्त तिखट, तेलकट, आंबट पदार्थ आणि त्रास वाढवणारे खाद्यपदार्थ कमी करा. सकाळी हलका नाश्ता घ्या.

  • भिजवलेले काळे मनुके हा पारंपरिक आहारातील पर्याय असू शकतो; मात्र अॅसिडिटीवरील उपचार म्हणून त्याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.

How to improve digestion and prevent daily acidity naturally
Women Health : गर्भवती महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका का वाढतोय? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या

रोज गोळी घेणे योग्य आहे का?

अॅसिडिटीची औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि योग्य कालावधीसाठी घ्यावीत. वारंवार अॅसिडिटी होत असल्यास स्वतःहून रोज औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची उलटी किंवा काळी शौच होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

टीप : अॅसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.